Monsoon Hair Care Tips : पावसात 'अशी' घ्या केसांची काळजी; केस कायम राहतील स्मूथ अँड सिल्की

Hair Care Tips In Monsoon : पावसात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये त्याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावरही होतो. यामुळे केस गळतीची समस्या वाढू लागते.
Hair Care Tips In Monsoon
Monsoon Hair Care TipsSaam TV
Published On

पावसाची सुरुवात होताच आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. अशा स्थितीत आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. पावसात आहाराबरोबरच केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर तुम्ही केसांचे सौंदर्य गमवू शकता. पावसात हवेतील ओलाव्यामुळे केसांशी संबंधित समस्या अधिक वाढतात. उदा. केस चिकट होणे, कोंडा होणे , केस गळणे यासाठी पावसात केसांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

Hair Care Tips In Monsoon
Hair Conditioner Benefits : प्रत्येक वेळी हेअर कंडिशनरची आवश्यकता का असते? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

पावसात कधीही केस बांधून ठेवू नये. यामुळे केसांची मूळं ओली राहतात आणि डोक्यात चावण्यास सुरुवात होते. पावसात केसांचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी केस धुतल्यावर त्यांना सीरम लावणेही गरजेचे आहे. यामुळे केसांची चमक वाढते आणि केस मऊ होण्यास मदत होते. पावसात जास्त मसालेदार आणि तेलकट पदार्थ खाऊ नये त्याचा परिणाम तुमच्या केसांच्या आरोग्यावरही होतो. यामुळे केस गळतीची समस्या वाढू लागते. सर्वात महत्त्वाचे पावसात बाहेर जाताना केसांना स्कार्फ गुंडाळावा. पावसात केसांच्या आरोग्यावर विशेष लक्ष देणे महत्त्वाचे आहे.

चला तर मग पावसात केसांची विशेष काळजी कशी घ्यावी जाणून घेऊयात

नियमित केसांना तेल लावणे

केसांची मुळे मजबूत करण्यासाठी केसांना तेल लावणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे केसांची चांगली वाढ होते. तसेच टाळू देखील निरोगी राहतो. त्यामुळे पावसातही केसांना तेल लावणे थांबवू नये. रात्री झोपताना केसांना तेलाने चांगले मसाज करा आणि सकाळी शॅम्पूने केस स्वच्छ धुवावे.

केसांना कंडिशनर लावा

पावसात हवेतील जास्त आर्द्रतेमुळे केस लवकर कोरडे होतात. अशा परिस्थितीत शॅम्पूनंतर कंडिशनर लावणे गरजेचे आहे. त्यामुळे केसांचा गुंता होत नाही आणि केस फ्रिज फ्री राहतात. केसांच्या मजबूतीसाठी नियमित केस धुतल्यावर कंडिशनर लावावे.

मायक्रो टॉवेलचा वापर

पावसाच्या पाण्यामुळे केस गळतीचे प्रमाण वाढते. अशावेळी केसांना तेल लावणे, शॅम्पू लावून केस धुवणे आणि त्यानंतर कंडिशनर लावणे पुरेस नसते. यासोबतच चांगल्या प्रतीचा टॉवेल केस कोरडे करण्यासाठी वापरणे गरजेचे आहे. पावसात ओले केस कोरडे करण्यासाठी मायक्रो टॉवेलचा वापर करावा. यामुळे केसांमधील पाणी चांगल्या पद्धतीने शोषले जाते तसेच केस देखील तुटत नाही.

ओले केस विंचरू नका

आजच्या धावपळीच्या जगात महिलावर्ग ओल्या केसांवर कंगवा फिरवून बाहेर पडतो. पण असे करणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले नाही. आले केस मऊ टॉवेलने स्वच्छ कोरडे करून मगच त्यामध्ये कंगवा फिरवा. ओल्या केसात कंगवा फिरवल्यास केसांची मुळ कमकूवत होतात आणि केस अधिक प्रमाणात गळू लागतात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचे समर्थन करत नाही.

Hair Care Tips In Monsoon
Homemade Hair Conditioners : कोरड्या केसांच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हे 3 घरगुती कंडिशनर्स वापरून पहा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com