आपण जे काही खातो त्याच्या थेट परिणाम आपल्या आरोग्यावर (Health) होत असतो. यामुळे प्रत्येकाने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आजकाल महिला आणि पुरूष केसांच्या आणि त्वचेच्या समस्येने मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत. (Latest Marathi News)
सध्या कामाचा वाढता ताण, वातावरणाच्या बदलामुळे तसेच खाण्यापिण्याकडे योग्य लक्ष न दिल्याने त्वचेच्या (Skin) आणि केसांच्या समस्या वाढत आहेत. यावर उपाय म्हणून बाजारात अनेक महागडी उत्पादने उपलब्ध आहेत. ज्याचा वापर अनेकजण करतात, मात्र यामुळे काहीवेळेस त्वचा खराब देखील होऊ शकते. जर तुम्हाला नैसर्गिक रित्या त्वचा उजळवायची असल्यास तुम्ही स्वयंपाकघरातील अळशीच्या बियांचा वापर करू शकता.
अळशीच्या बियां आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. अळशीच्या बियांची पेस्ट चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील काळे डाग कमी होण्यास मदत होते. अनेक महिला अळशीच्या बियांचा वापर चेहरा स्क्रब करण्यासाठीही करतात. ज्यामुळे त्वचेच्या आतील छिंद्रे साफ होतात. अळशीच्या बियामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म त्वचेतील जळजळ व लालसरपणा कमी करते. अळशीच्या बियाचें तेल चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्या कमी होऊन चेहरा चमकतो.
अळशीच्या बियांची बारीक पेस्ट करून घ्या. पेस्टमध्ये एलोवेरा जेल आणि कॉफी पावडर मिसळून चेहरा स्क्रब म्हणून वापरा.
अळशीच्या पेस्टमध्ये दूध मिसळून फेस मास्क म्हणून लावा. १० ते १५ मिनिटानंतर चेहरा धुतल्याने चेहरा उजाळून निघेल.
अळशीच्या पेस्टमध्ये थोडी मुलतानी माती किंवा मध मिसळून चेहऱ्याला लावल्याने मुरूमे कमी होण्यास मदत होईल.