Health Tips : आजपासूनच 'हे' ५ पदार्थ खाणे टाळा; तुमचे दात अक्रोडसारखे मजबूत राहतील

Healthy Teeth : दात किडण्यामागे मुख्य कारण दातांवर बॅक्टेरिया जमा होणे हे आहे. हे बॅक्टेरिया आपल्या रोजच्या चुकीच्या खाण्यामुळे तयार होतात.
Healthy Teeth
Health TipsSaam TV

आजकाल मोठ्यांपासून लहानांपर्यंत बरेच जण दातांच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. दात किडणे ही सामान्य समस्या असली तरी त्याचे मोठे परिणाम माणसांना भोगावे लागतात. दात किडण्यामागे मुख्य कारण दातांवर बॅक्टेरिया जमा होणे हे आहे. हे बॅक्टेरिया आपल्या रोजच्या चुकीच्या खाण्यामुळे तयार होतात.

Healthy Teeth
Ghee and Black Paper for Health: तूप आणि काळीमिरी एकत्र खाल्ल्यामुळे आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

दातांची समस्या टाळण्यासाठी आपल्याला आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे. दात लवकर कमकुवत होणे भविष्यासाठी चांगले नाही. आहार योग्य असल्यास दात किडणे, हिरड्यांमधून रक्त येणे, दातांना संसर्ग होणे या समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागत नाही. त्यामुळे दात खराब करणारे पदार्थ नेमके कोणते आहेत? तेच आज जाणून घेणार आहोत.

साखर आणि मिठाई

साखर आपल्याला खूप आवडत जरी असली तरी ती दातांची मोठी शत्रू आहे. साखरेचे जास्त सेवन आरोग्यासाठी आणि दातांसाठी चांगले नाही. त्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. साखरेमुळे दातांमध्ये बॅक्टेरिया तयार होतात ज्यामुळे दात लवकर खराब होतात तसेच दातांमध्ये पोकळी देखील निर्माण होते.

थंड पेय

सोडा आणि अन्य कार्बोनेटेड पेये पिल्याने दातांना नुकसान होते. हे पेय थंड असल्यामुळे हिरड्यांमधून रक्त येऊ शकते. दात कमकुवत होतात आणि त्यांमध्ये पोकळी देखील निर्माण होते.

चिकट पदार्थ

चिकट पदार्थ मोठ्या प्रमाणात दातांचे नुकसान करतात. जास्त काळापर्यंत हे पदार्थ दातांना चिकटून राहतात. चिकट पदार्थांमुळे दातांवर मोठ्या प्रमाणात जंतू तयार होतात. उदा. मैदा आणि त्यापासून बनलेले पदार्थ.

स्टार्च युक्त पदार्थ

स्टार्च युक्त पदार्थ जसे की चिप्स आणि ब्रेड खाल्ल्यामुळे ते दातांना चिकटतात. त्यातून आम्ल पदार्थ तयार होतात ज्यामुळे दातांचे आरोग्य बिघडते आणि दात लवकर पडतात.

लिंबूवर्गीय पदार्थ

लिंबूवर्गीय पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात फळांचा समावेश असतो. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दातांवर एॅसिड तयार होते. आंबट पदार्थ जास्त प्रमाणात खाणे टाळा. आंबट जास्त खाल्ल्याने काही सेंसिटिव्ह दात लगेचच आंबतात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Edited By : श्रेया मास्कर

Healthy Teeth
Tomato Juice for Health: रिकाम्या पोटी टोमॅटो ज्यूस पिण्याचे जबरदस्त फायदे जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com