बाळाच्या दातांची देखभाल कशी करता येईल ?

बाळ जन्मल्यानंतर काही महिन्यातच त्याच्या हिरड्या कडक होऊ लागतात.
How to take care of baby teeth, baby care tips in Marathi
How to take care of baby teeth, baby care tips in Marathiब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
Published On

मुंबई : बाळ जन्मल्यानंतर काही महिन्यातच त्याच्या हिरड्या कडक होऊ लागतात आणि मग आपल्याला समजते की, बाळाला दात येऊ लागले आहे. (baby care tips in Marathi)

हे देखील पहा-

बोबड्या बोलांमध्ये हळूच एकादा पांढरा शुभ्र मोती चमकावा तसा बाळाच्या तोंडात दात दिसला की, आपला आनंद गगनात मावेनासा होतो. सुंदर हसण्यासाठी व निरोगी राहण्यासाठी कोणत्याही वयात दातांची काळजी घेणे गरजेचे आहे. बाळाचे दुधाचे दात नाजुक असतात आणि त्यांची काळजी पक्क्या दातांपेक्षाही जास्त घ्यावी लागते. जर बाळाच्या दातांकडे सुरवातीपासूनच लक्ष दिले तर पक्के दात येताना त्याला कसलाही त्रास होत नाही. यावेळी बाळाला त्रास होत असला तरी आपण त्यांची काळजी घ्यायला हवी. हळूहळू बाळ ७ ते ८ महिन्यांचे झाले की, पालक म्हणून आपण त्यांना पौष्टिक अन्न खाण्यास व त्यांना काही पदार्थ चावण्यास देतो परंतु, त्यानंतर त्यांच्या दातांची काळजी कशी राखावी हे पाहूया

अशाप्रकारे घ्या बाळाच्या दातांची काळजी -

१. मऊ कपड्याने बाळाच्या हिरड्या साफ कराव्यात. यामुळे त्यांच्या नाजुक हिरड्यांचे नुकसान होणार नाही आणि हिरड्यांची साफसफाईही होईल.

२. बाळाची प्लेट, चमचा व वाटी वेगळी ठेवावी. त्यांचा वापर इतर कोणीही करू नये. कारण यामुळे बाळाला इंफेक्शन होऊ शकते.

How to take care of baby teeth, baby care tips in Marathi
असा द्या मुलांना शाळेच्या पहिल्या दिवशी टिफिन बॉक्स

३. व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरपूर खाणे द्यावे. यामुळे दात आणखी जास्त मजबूत होतील. बाळाला कॅल्शियम, फ्लोराइड, फास्फोरस व व्हिटॅमिन डीची गरज असते. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत होत असतात.

४. बाळाला (Baby) बाटलीऐवजी दूध कपाने पाजण्याचा प्रयत्न करावा.

५. गोड औषधांमुळेही मुलांचे दात खराब होऊ शकतात. कारण ती दाताला चिकटत असतात. यासाठी मुलांना गुळणा करायला लावा.

६. दूध (Milk) पिऊन झाल्यावर स्वच्छ ओल्या कपड्याने बाळाच्या हिरड्या पुसून काढाव्यात.

७. मूल १८ महिन्यांचे होईल तेव्हा आपण त्याला ब्रश करायला मदत करू शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com