Beauty Skin Tips : रखरखत्या उन्हात मेकअप मेल्ट होतोय? मग 'या' टीप्स फॉलो करा, घाम आला तरी स्किन ग्लो करेल

Makeup Summer Tips : मेकअप केल्यावर उन्हात गेल्यानंतर लेगचच घाम येतो आणि मेकअप मेल्ट होतो. त्यामुळे आज त्यावरील उपाय जाणून घेऊ.
Makeup Summer Tips
Beauty Skin TipsSaam TV

सध्या जास्त प्रमाणात उष्णता वाढली आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिक हैराण झालेत. त्यात मुलींना बाहेर ऑफिसला किंवा काही फंक्शनला जाताना मेकअप करावा वाटतो. मात्र मेकअप केल्यावर उन्हात गेल्यानंतर लेगचच घाम येतो आणि मेकअप मेल्ट होतो. त्यामुळे आज त्यावरील उपाय जाणून घेऊ.

Makeup Summer Tips
Eye Makeup Tips : डोळे सुंदर दिसण्यासाठी तुम्हीही मस्करा लावताय ? या स्वस्त आणि मस्त मस्कराने वाढवा सौंदर्य

मेकअप करण्याआधी ही काळजी घ्या

मेकअप करण्याधी एखाद्या माइल्ड फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर सूती किंवा सॉफ्ट रुमालाने चेहरा पुसून कोरडा करून घ्या. स्किन पूर्ण कोरडी झाल्यावर मेकअप करण्यास सुरुवात करा. चेहरा न धुता मेकअप केल्याने तो सेट होत नाही.

जास्त मेकअप करू नका

मेकअप करताना विशेष काळजी या गोष्टीची घ्या की तुम्ही जे प्रोडक्ट लावत आहात ते एकावर एक लावू नका. पहिली क्रीम चेहऱ्यात छान एब्सोर्ब झाल्यानंतर दुसरी क्रीम लावा. तसेच मेकअपमध्ये सिरम, मोश्चराईज आणि सनस्क्रीनचा वापर करा.

बेक पावडर

मेकअप केल्यावर चेहऱ्यावर लावण्यासाठी विविध ब्रँडच्या बेक पावडर मिळतात. बेक पावडर लावल्याने मेकअप छान सेट होतो. त्यामुळे मेकअप झाल्यावर चेहऱ्यावर बेक पावडर नक्की लावा.

मेकअप फिक्सर

मेकअप फिक्सर हे एक लिक्वीड आहे. बॉटलमध्ये ते स्प्रेच्या स्वरुपात असतात. त्यामुळे मेकअप झाला की फिक्सर स्प्रे चेहऱ्यावर अप्लाय करा. त्याने उन्हात गेल्यावर देखील मेकअप नीट राहील.

Makeup Summer Tips
Republic Day Makeup Tip: प्रजासत्ताक दिनी तुम्हालाही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसायचे आहे, असा करा मेकअप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com