Republic Day Makeup Tip: प्रजासत्ताक दिनी तुम्हालाही सगळ्यांपेक्षा वेगळे दिसायचे आहे, असा करा मेकअप

Makeup Tips of Republic Day 2024: दरवर्षीप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.
Makeup Tips of Prajasattak Din 2024 (26 January 2024)
Makeup Tips of Prajasattak Din 2024 (26 January 2024)Saam Tv
Published On

Makeup Tips For 26 January :

दरवर्षीप्रमाणे यंदाही 26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा (Celebrate) केला जाणार आहे. हा दिवस भारतातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे.

भारतीय कुठेही राहत असले तरी ते प्रजासत्ताक दिन (Republic Day) आणि स्वातंत्र्यदिन साजरा करायला विसरत नाहीत. या दिवसाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाल्यास, 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. अशा स्थितीत या दिवशी प्रत्येकजण देशभक्तीच्या रंगात रंगलेला दिसतो.

विशेषतः जर आपण या दिवशी तिरंग्याच्या रंगाचा पेहराव प्रत्येकजण करतात. तर त्यात मुलींबद्दल बोलायचे झाले तर, प्रत्येक मुलगी सणांच्यावेळी खास दिसण्याचा प्रयत्न करतात. तसेच याही दिवशी मुली खास तयारी करतात.

Makeup Tips of Prajasattak Din 2024 (26 January 2024)
Republic Day 2024: प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील कारण

यासाठी त्या त्यांच्या कपड्यांमध्ये आणि मेकअपमध्ये तिरंग्याचा टच देण्याचा प्रयत्न करतात. तुम्हालाही या प्रजासत्ताक दिनी तिरंग्याच्या रंगांपासून प्रेरणा घेऊन तयार व्हायचे असेल तर येथे दिलेल्या काही टिप्स जाणून घ्या.

सर्व प्रथम, फाउंडेशन लावा

चेहऱ्यावर तिरंगी मेकअप करण्यापूर्वी त्वचेचा फाऊंडेशन लावण्यापूर्वी मॉस्चराईझर लावा. आणि मग टोन समान करण्यासाठी फाऊंडेशन खूप महत्वाचे आहे. सर्वप्रथम तुमच्या त्वचेच्या टोननुसार चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. फाऊंडेशन व्यवस्थित मिसळल्यावरच पुढचा मेकअप सुरू करा.

ट्राय कलर आयशॅडो

जर तुम्हाला वेगळ्या पद्धतीने आयशॅडो लावायचा असेल तर सर्वप्रथम डोळ्यांवर प्राइमर लावा. केवळ प्राइमरच्या मदतीने तुमची आयशॅडो योग्य प्रकारे टिकेल. यानंतर प्रथम ऑरेंज आय शॅडो, नंतर पांढरा आणि शेवटी हिरवा लावा. ते अशा प्रकारे सेट करा की तिन्ही रंग स्वतंत्रपणे दिसतील.

Makeup Tips of Prajasattak Din 2024 (26 January 2024)
Republic Day 2024: यंदाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असेल? पाहा फर्स्ट लूक

तिरंगा लाइनर

जरी बहुतेक मुली फक्त काळ्या रंगाचे लाइनर वापरतात, परंतु तुम्हाला बाजारात प्रत्येक रंगाचे लाइनर सहज मिळतील. हे वापरण्यासाठी प्रथम हिरव्या रंगाचे लाइनर लावा. यानंतर पांढरा आणि नंतर केशरी. यामुळे तुमचा लूक क्यूट होईल.

ग्लिटर आयशॅडो

जर तुम्हाला आय मेकअप हायलाइट करायचा असेल तर ग्लिटर आयशॅडो हा एक चांगला पर्याय आहे. सामान्य आयशॅडोप्रमाणेच तुम्ही याचा वापर करू शकता. यामुळे डोळे अधिक चमकतील.

Makeup Tips of Prajasattak Din 2024 (26 January 2024)
Jio Republic Day ची जबरदस्त Offer, एका रिचार्जवर मिळणार 13 हजारपेक्षा जास्त किमतीचे फायदे

नेल पेंट

मेकअपसोबतच तुम्ही तुमचे नखे हायलाइटही करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त तिरंग्याचे रंग वापरून नेल आर्ट करावे लागेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे नेल पेंट स्वतःही वापरू शकता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com