Republic Day 2024: यंदाच्या प्रजासत्ताकदिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ कसा असेल? पाहा फर्स्ट लूक

Republic Day 2024 Maharashtra Chitrarath : यंदा प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ आपलं वेगळेपण दाखवणार आहे. यावर्षीची थीम छत्रपती शिवाजी महाराज आहे.
Maharashtra Chitrarath
Maharashtra ChitrarathGoogle
Published On

Maharashtra Chitrarath In Republic Day Pared Delhi

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर होणाऱ्या संचलनात तमाम देशवासियांचं लक्ष वेधून घेणारा महाराष्ट्राचा चित्ररथ कायम चर्चेचा विषय असतो. यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथाने आपलं वेगळेपण कायम ठेवणार आहे. चला तर मग यंदाच्या थीमविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Republic day latest news)

यंदाच्या प्रजासत्ताक दिनी राजधानी दिल्लीत कर्तव्यपथावर महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान आहे. हीच यावर्षीची (Republic Day 2024) थीमदेखील आहे. यावर्षी देखील महाराष्ट्राचा चित्ररथ सर्वांचं लक्ष वेधून घेणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कसा आहे यावर्षीचा चित्ररथ

यंदाच्या चित्ररथावर राजमाता जिजाऊ , बाल शिवाजी आणि त्यांचे राजकारण समानता आणि समभाव या विचारांचा देखावा असणार (Chhatrapati Shivaji Maharaj theme) आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र आणि राज चिन्हांचाही समावेश आहे. चित्ररथावर अष्टप्रधान मंडळाचा दरबारही दिसणार आहे. किल्ले रायगडची प्रतिकृती आणि राजमुद्राही चित्ररथावर असणार (Republic Day 2024) आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य सरकार विशेष चित्ररथ सादर करणार आहे. मागील वर्षीही महाराष्ट्राच्या चित्ररथाला दुसरा क्रमांक मिळाला होता. महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) नेहमीच आपलं वेगळंपण दाखवत असतो.

यावर्षी (Republic Day 2024) 16 राज्य, सहा केंद्रशासित प्रदेश आपले चित्ररथ सादर करणार आहे. चित्ररथ सादर करण्यासाठी चक्राकार पद्धतीने राज्यांना संधी दिली जाते. 2016 मध्ये महाराष्ट्राने पंढरीच्या वारीचा चित्ररथ सादर केला होता. 2018 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथ सादर केला होता. चित्ररथ (Maharashtra Chitrarath) सादर करण्यात 1993, 1994, 1995 सलग तीन वर्ष महाराष्ट्राला अव्वल क्रमांक मिळाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com