Republic Day 2024: प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या त्यामागील कारण

Republic Day : २६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याचवेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले.
Republic Day
Republic Daysaam Tv
Published On

Republic Day celebrated on January 26:

दरवर्षी २६ जानेवारीला प्रत्येक भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करतो. मात्र अजूनही भारताच्या प्रजासत्ताक दिनाबाबत आणि त्या संदर्भातील परिपूर्ण माहिती भारतातील नागरिकांना नसते. दरम्यान प्रजासत्ताक दिन फक्त २६ जानेवारीलाच का साजरा करतो आणि इतर कोणत्याही दिवशी का नाही करत? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो आणि याचबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (Latest News)

२६ जानेवारी १९५० रोजी या दिवशी संविधान लागू करण्यात आले, ज्याची अनेक कारणे होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने राज्यघटना स्वीकारली. त्याच वेळी २६ जानेवारी १९५० रोजी लोकशाही शासन प्रणालीसह संविधान लागू करण्यात आले. या दिवशी भारताला पूर्ण प्रजासत्ताक घोषित करण्यात आले. २६ जानेवारीला संविधान लागू करण्याचे मुख्य कारण म्हणजे १९३० मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची घोषणा केली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सन १९२९ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये सर्वसंमतीने असे घोषित करण्यात आले की ब्रिटिश सरकारने २६ जानेवारी १९३० पर्यंत भारताला डोमिनियन दर्जा द्यावा. या दिवशी प्रथमच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.

१५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळेपर्यंत स्वातंत्र्य दिन २६ जानेवारीलाच साजरा केला जात होता. २६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू करण्यात आले आणि २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला महत्त्व देण्यासाठी २६ जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला.

ज्या संविधानाच्या अनुषंगाने आज देशात काम चालू आहे तो मसुदा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ.भारतरत्न बाबासाहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी तयार केला. अनेक सुधारणा आणि बदलांनंतर, समितीच्या ३०८ सदस्यांनी २४ जानेवारी १९५० रोजी हस्तलिखित कायद्याच्या दोन प्रतींवर सह्या केल्या. त्यानंतर दोन दिवसांनी २६ जानेवारी रोजी तो देशात लागू करण्यात आला.

या राज्यघटनेनुसार भारत लोकशाहीप्रधान देश बनला. भारताला प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आलं. त्यामुळे दरवर्षी २६ जानेवारी हा दिवस 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी २६ जानेवारी १९५० रोजी २१ तोफांच्या सलामीसह ध्वजारोहण केलं आणि भारताला 'प्रजासत्ताक राष्ट्र' म्हणून घोषित केलं. त्यानंतर प्रत्येक वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा केला जाऊ लागला. देशाचे प्रथम नागरिक म्हणजेच राष्ट्रपती हे प्रजासत्ताक दिनी समारंभात सहभागी होतात. राष्ट्रपतीच या दिवशी झेंडा फडकवतात.

प्रजासत्ताक दिनाची गणना कॅलेंडर वर्षाच्या आधारावर केली जात नाही. उलट भारतीय संविधान स्वीकारल्यापासून किती वर्ष झाली यावर आधारित आहे. त्यानुसार ऐतिहासिक घटना २६ जानेवारी १९५० रोजी घडली व २०२४ म्हणजे यंदा प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन दिन आहे

Republic Day
Flag of India: तिरंगा ध्वजाआधी भारताचे किती ध्वज होते ?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com