Hing Benefits: जेवणात मिसळा एक चमचा हिंग अन् अनेक आजार दूर पळवा; जाणून घ्या फायदे

Hing Benefits To Health: हिंग हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. हिंग खालल्याने पचनसंस्था सुरळीत काम करते. हिंग खालल्याने अॅसिडिट, पोटदुखी या समस्यांपासून आराम मिळतो.
Hing Benefits
Hing BenefitsSaam Tv

भारतात प्रत्येक स्वयंपाकघरात हिंग हा पदार्थ असतोच. मसाल्याचा डबा हा हिंगाशिवाय अपूर्ण असतो. हिंग जेवणाची चट वाढवतो. हिंग हे जेवणाची चव वाढवण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे. हिंग हे पचनसंस्था दूर करण्यास मदत करते. तसेच पोटातील गॅस, अॅसिडिटीसारख्या समस्या कमी होतात. त्याचसोबत सर्दी, खोकल्यासाठीही हिंग चांगले असते.

फेरुला-फोइटिडा या वनस्पतीतील रसापासून हिंग तयार केले जाते. यात अनेक पौष्टिक घटक असतात. जास्त हिंग खाणेदेखील शरीरासाठी चांगले नसते. हिंग हे प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे तुम्ही नेहमी निरोगी राहू शकतात.

हिंगाचे फायदे

हिंगामध्ये अँटी इम्फ्लामेंटरी गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीरातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. याचसोबत हिंगात अँटी बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचेवरील मुरुम, फोड्या कमी करण्यास मदत होते. हिंग अनेक जंतूपासून शरीराचे संरक्षण करते. हिंगात एनाल्जेस्टिक आणि अँटी इम्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात. जे मासिक पाळीच्या वेळी वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात.

Hing Benefits
Health Tips : सायंकाळची हल्की-फुल्की भूक आता मिटणार झटपट; खा 'हे' पौष्टीक पदार्थ

हिंगामधील घटक रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. यामुळे हृदयाच्या संबंधित समस्या कमी होतात. रक्त पातळ होण्यास मदत होते. त्यामुळे रक्ताभिसरण सुरळीत होते. हिंग खालल्याने पचनसंस्था व्यवस्थित काम करते. त्यामुळे पोटदुखी कमी होते.

Disclaimer- ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Hing Benefits
Anger Management Tips: नको त्या गोष्टींवर सुद्धा राग येतोय? आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याआधी असं करा कंट्रोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com