Health Tips : सायंकाळची हल्की-फुल्की भूक आता मिटणार झटपट; खा 'हे' पौष्टीक पदार्थ

Evening Snacks : संध्याकाळच्या नाश्त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि आपला मूड देखील फ्रेश होतो. रोज आपल्या सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी हे पौष्टीक आणि झटपट बनणारे खाण्याचे पर्याय नक्की घरी ट्राय करा.
Evening Snacks
Health TipsSaam TV

सुदृढ आरोग्यासाठी पौष्टीक खाणे आणि वेळेवर खाणे खूप गरजेचे आहे. आपण सर्वजण २४ तासांत २ वेळा जेवण करतो जे उत्तम आहे. पण दुपारचं जेवण झाल्यावर आपल्या सर्वांनाच सायंकाळी हल्की-फुल्की भूक लागते आणि आपण यासाठी अनेक पदार्थ शोधत राहतो, पण हे पदार्थ पौष्टीक असणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.

Evening Snacks
High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

संध्याकाळचा नाश्ता आरोग्याच्यादृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. संध्याकाळच्या नाश्त्यामुळे रात्री चांगली झोप येते तसेच वजन कमी होण्यासही मदत मिळते. संध्याकाळच्या नाश्त्यामुळे शरीराला एनर्जी मिळते आणि आपला मूड देखील फ्रेश होतो. रोज आपल्या सायंकाळच्या छोट्या भुकेसाठी हे पौष्टीक आणि झटपट बनणारे खाण्याचे पर्याय नक्की घरी ट्राय करा.

ओले ड्रायफ्रूटस

सकाळी काजू, बदाम, अक्रोड आणि ४-५ मनुके पाण्यामध्ये भिजवून ठेवावे आणि सायंकाळी नाश्त्याला याचा आस्वाद घ्यावा, यामुळे पोट भरलेले राहते. हा पौष्टीक आणि पचायला हलका असा स्नॅक आहे.

चण्याचे सॅलड

भिजलेल्या पांढऱ्या चण्यांमध्ये बारीक कापलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, काकडी आणि टोमॉटो टाकून एकत्र छान मिक्स करून घ्यावे. अजून चव वाढवण्यासाठी त्यामध्ये चाट मसाला, लिंबू आणि चवीनुसार मीठ घाला आणि सर्व एकत्र करून घ्या.

फळे

हंगामी फळे खाणे सर्वोत्तम नाश्ता आहे. तुम्ही विविध फळांचे मिल्कशेक तयार करूनही पिऊ शकता. सफरचंद्र, डाळिंब , किवी या पौष्टीक फळांचा आपल्या आहारात समावेश असावा.

मोड आलेले कडधान्य

मोड आलेल्या कडधान्यांमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या घालून तुम्ही एक पौष्टीक भेल बनवू शकता. चवीसाठी त्यामध्ये थोडा चाट मसाला देखील घालावा आणि चवीने भेलचा आस्वाद घ्यावा.

मखाना

भाजलेले मखाने हा संध्याकाळच्या नाश्त्याचा उत्तम पर्याय असू शकतो. मखाने खाल्ल्याने जास्त काळ पोट भरलेले राहते.

भेळ

थोडेसे फुटाणे आणि मुरमुरे एकत्र करून त्याची भेळ बनवून तुम्ही खावू शकता. हा नाश्ता पचायला हलका असतो.

दूध-बिस्किट

रोज सायंकाळी हलके गरम दूध आणि बिस्किट खावे, त्यामुळे पोट लवकर भरते आणि जास्त भूकही लागत नाही.

Evening Snacks
Summer Foods: उन्हाळ्यात 'या' भाजीचे सेवन शरीरासाठी ठरेल उपयुक्त

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com