High Calcium Foods : दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम असलेले पदार्थ; लहान मुलांच्या बुद्धीला चालना मिळेल अन् हाडं होतील मजबूत

More Calcium Than Milk : तुमची मुलं देखील दूध पिण्यासाठी कंटाळा करत असतील तर आम्ही तुमच्यासाठी अन्य काही पदार्थ आणले आहेत. यामध्ये दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम देखील असणार आहे.
More Calcium Than Milk
High Calcium FoodsSaam TV

लहान मुलांना दररोज दूध पिण्यास सांगितले जाते. अनेक पालक अगदी मुलं ५वी किंवा ६वीला जाईपर्यंत त्यांना दूध पिण्यासाठी देतात. मात्र लहान मुलांना सतत दूध पिऊन याची चव अजिबात आवडत नाही. अशावेळी काही पालक मुलांना दूधात चॉकलेट सिरप किंवा हॉर्लेक्स सारख्या गोष्टी मिक्स करून देतात.

मात्र असे केल्याने दूधातील कॅल्शिअम कमी होते. मुलांच्या आरोग्यावर देखील याचा वेगळा परिणाम होतो. तर आाता तुमची मुलं देखील दूध पिण्यासाठी कंटाळा करत असतील तर आम्ही तुमच्यासाठी अन्य काही पदार्थ आणले आहेत. याचे सेवन लहान मुलं मोठ्या आवडीने करतील. शिवाय यामध्ये दूधापेक्षा जास्त कॅल्शिअम देखील असणार आहे.

दही

एक कप दह्यात ४४८ मिलीग्राम कॅल्शिअम असते. त्यामुळे मुलांना जेवणात तुम्ही दही देऊ शकता. जेवणात कोशींबीरसोबत दही खाल्ल्याने याची चव आणखी रुचकर लागते. दह्यात तुम्ही लहान मुलांना कलिंगड, द्राक्ष, डाळींब टाकून देखील देऊ शकता. यामुळे लहान मुलांचं आरोग्य आणखी सुधारतं.

बदामचे दूध

मुलांना साधं प्लेन दूध प्यायला आवडत नसेल तर त्यांना बादामचे दूध पिण्यासाठी द्या. यामध्ये बदामाचे काही काप किसून टाका. यामध्ये जास्तप्रमाणात कॅल्शिअम कार्बोनेट असतं. त्यामुळे तुम्ही देखील कायम आहारात या दूधाचा समावेश करू शकता. या दूधामुळे लहान मुलांची स्मरणशक्ती देखील चांगली सुधारते.

संत्री रस

संत्रीच्या रसामध्ये ३४७ मिलीग्राम कॅल्शिअम असतं. दररोज एक कप तरी संत्रीचा रस प्यायला हवा. त्याने शरिरातील कॅल्शिअमची कमतरता भरून निघते. अनेक लहान मुलांमध्ये कॅल्शिअम कमी असल्यास चेहऱ्यावर पांढरे डाग उमटतात. त्यावर उपाय म्हणून तुम्ही मुलांना संत्रीचा ज्यूस पिण्यासाठी देऊ शकता.

ओट्स दूध

ओट्सचे दूध देखील आपल्या आरोग्यासाठी फार चांगले आहे. लहान मुलांना हे दूध पिण्यासाठी दिल्ल्याने त्यांची हाडे आणखी मजबूत होतात. फॉर्टिफिकेशन करताना यामध्ये कॅल्शियम कार्बोनेट मिसळले जाते.

सोयामिल्क

सोयाचाप सारखे पदार्थ तर तुम्ही फार आवडीने खात असाल. तसेच सोयामिल्क देखील तुमच्या मुलांना पिण्यासाठी द्या. सोयामिल्कमध्ये बाकीच्या दूधाच्या तुलनेत फार जास्त प्रमाणात दूध असते. त्यामुळे आजपासूनच लहान मुलांना सोयामिल्क पिण्यासाठी द्या.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही कॅल्शिअम संबंधीत या माहितीचा दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com