Anger Management Tips: नको त्या गोष्टींवर सुद्धा राग येतोय? आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याआधी असं करा कंट्रोल

Anger Management Tips: काही लोकांना अगदी लहान गोष्टींमुळे राग येतो. सतत राग येणे शरीरासाठी हानिकारक ठरु शकते. त्यामुशे रागावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी या टीप्स फॉलो करा.
Anger Management Tips
Anger Management TipsSaam Tv

प्रत्येक व्यक्तीचा वेगवेगळा स्वभाव असतो. काही माणासांना पटकन राग येतो तर काहींना कधीच राग येत नाही. काही लोक नेहमी लहान-सहान गोष्टींवर रागावतात. यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. सतत राग आल्यावर तुमचे समोरच्या व्यक्तीसोबत वाईट संबंध तयार होतात. त्यामुळे तुमचे आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

एका अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, तुमचा राग हा तुमच्या हृदयासाठी हानिकारक ठरु शकतो. त्यामुळे वेळेआधीच तुम्ही रागावर नियंत्रण ठेवायला शिका. याचा तुम्हाला भविष्यात फायदा होईल. रागावर नियंत्रण करण्यासाठी तुम्ही स्वतः मध्ये लहान लहान बदल करायला शिका. रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्ही काही सोप्या टीप्स फॉलो करा.

तुम्हाला ज्या गोष्टींचा राग येतो त्या ओळखा

तुम्हाला ज्या गोष्टींचा राग येतो त्या सर्वात आधी ओळखायला शिका. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग येत असेल तर त्या सवयी किंवा ती गोष्ट करणे सोडून द्या. तुमच्या एखाद्य सवयींमुळे तुम्हाला राग येत असेल तर ती गोष्ट करु नका. यामुळे तुम्हालाच त्रास होईल.

ब्रेक घ्या

नेहमी रागाच्या भरात माणूस काहीही बोलतो. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला वाईच वाटते. याचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होतो. त्यामुळे जेव्हा तुम्हाला राग येईल तेव्हा शांत व्हा. थोडा वेळ लांब जाऊन बसा. यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल.

Anger Management Tips
Vat Purnima 2024 : यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

विचारपूर्वक बोला

राग आल्यावर माणूस विचार न करता काहीही बोलतो. त्यामुळे दोन व्यक्तींमधील संबंध आणखी बिघडतात. या परिस्थितीत तुम्ही नेहमी विचार करुन बोला. राग आल्यावर श्वास घ्या आणि काही वेळानंतर शांत झाल्यावर समोरच्या व्यक्तीशी संवाद साधा.

मेडिटेशन, योगा करणे

मेडिटेशन करणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. मेडिटेशन केल्याने तुमचे तुमच्या शरीरावर नियंत्रण राहते. यामुळे तुम्ही तुमच्या मनावर,रागावर नियंत्रण करु शकतात. योगा केल्याने माणसाचे मन स्थिर होते. ज्या व्यक्तीचे मन स्थिर आहे. त्या व्यक्तीला कधीच जास्त राग येत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमी योगा करा.

Anger Management Tips
Thailand Tour IRCTC Package: अथांग समुद्रकिनारे, सुंदर बेट अन् बरंच काही; IRCTC सोबत थायलँडची ही ट्रीप नक्कीच बुक करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com