Manasvi Choudhary
स्लिम आणि फिट दिसण्यासाठी सर्वचजण जिमला जाण्याचा पर्याय निवडतात.
मात्र तुम्हाला माहित आहे का? घरच्या घरी काही योगा केल्याने तुमच्या शरीरात नक्कीच बदल होतो.
घरामध्ये किंवा घराच्या अंगणात सहज करता येणारा व्यायाम म्हणजे सूर्यनमस्कार.
दररोज सकाळी सूर्यनमस्कार केल्याने शरीराला आराम मिळतो व शरीर दिवसभर ताजेतवाने राहते.
हा व्यायाम घरीच्या घरी तुम्ही सहज करू शकता. ज्यामुळे शरीराच्या स्नायूंचा व्यायाम होतो.
इनडोअर व्यायामामध्ये पुशअप्स केला जातो. पुशअप्स करताना जमिनीवर पोटावर हलके झोपूनस तळवे खांद्यांच्या साहाय्याने करत शरीर वर-खाली करावे.
स्किपींग म्हणजेच दोरी उड्या. घरच्या घरी दोरीच्या सहाय्याने हा व्यायाम केल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होईल.
पाय दोन्ही साईडने थोडे पसरवून हात सरळ रेषेत ठेवा. यानंतर थोडे हलके खुर्चीवर बसल्याप्रमाणे दहा वेळा करा.
घरच्या घरी अगदी सोप्या पध्दतीने तुम्ही डान्स करून वजन कमी करू शकता.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.