Vat Purnima 2024 Muhurt: यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Vat Savitri Vrat 2024 Date, Muhurt, Puja Vidhi and Improtance in Marathi: वटपौर्णिमा हा सण २१ जून शुक्रवारी सर्वत्र साजरी केला जाणार आहे. वट सावित्रीच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.
Vat Purnima 2024 Muhurt: यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
Vat Purnima 2024 Saam TV

यावर्षी वटपौर्णिमा शुक्रवारी २१ जून रोजी साजरी केली जाणार आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी शुभ मुहूर्तावर पूजा केल्यास जोडप्यांचे जीवन सुख, शांती, समृद्धी आणि भरभराटीने भरून जाते. तर जाणून घेऊयात यावर्षी वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे?

Vat Purnima 2024 Muhurt: यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
Vat Purnima 2023: अशी बायको नको रे बाबा! छत्रपती संभाजीनगरमध्ये पुरूषांनी साजरी केली 'पिंपळ पौर्णिमा'

भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्त्व आहे आणि प्रत्येक सणाचे एक वेगळे पावित्र्य आहे. महिलावर्ग या सणांची आतूरतेने वाट पाहत असतात. यावर्षी वटपौर्णिमा हा सण २१ जून शुक्रवारी सर्वत्र साजरी केला जाणार आहे. वट सावित्रीच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास करतात.

वट सावित्रीला वडाच्यावृक्षासोबतच सत्यवान आणि सावित्री यांचीही पूजा केली जाते. वट सावित्रीच्या दिवशी शनी अमावस्या आहे. त्यामुळे याला शनी जयंती असेही म्हणतात. यादिवशी वडाच्यावृक्षासोबत जर पिंपळाच्या झाडाचीदेखील पूजा केल्यास शनीदेव तुमच्यावर प्रसन्न होईल. तुमच्या आयुष्यातील नकारात्मकताही दूर होईल.

वटपौर्णिमेच्या पूजेचा मुहूर्त

ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी पौर्णिमा सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होईल आणि २२ जूनला संध्याकाळी ५ वाजून ३७ मिनिटांनी संपेल. वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त २१ जून रोजी सकाळी ५ वाजून २४ मिनिटांनी ते १० वाजून ३० मिनिटांपर्यंत आहे.

वट सावित्रीच्या व्रताचे महत्त्व जाणून घ्या

हिंदू धर्मामध्ये वटसावित्रीच्या व्रताला मोठे महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दिर्घायुष्यासाठी करते. या दिवशी महिला हौशीनं नटून-थटून वडाची पूजा करतात. पौराणिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते आणि त्याला चांगले आरोग्य लाभते. वट सावित्रीच्या दिवशी स्त्रिया सकाळी लवकर उठून स्नान करून आपल्या अखंड सौभाग्यासाठी पूजा करतात. या दिवशी महिला १६ श्रृंगार करून व्रताची पूजा करतात.

वटपौर्णिमेची पूजा विधी

सर्वप्रथम महिलेने सकाळी लवकर उठून आंघोळ करून पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करावे आणि त्यानंतर नवऱ्याचा चेहरा पाहा. साजश्रुंगार करून वडाची पूजा करावी. एका वडाच्या झाडाखाली सावित्री आणि सत्यवानाच्या मूर्तीची स्थापना करा आणि वटवृक्षाला पाणी अर्पण करा तसेच फुले,मिठाई आणि भिजलेले हरभरे देखील अर्पण करा. यानंतर वटवृक्षाला सात वेळा प्रदक्षिणा घाला. या व्रतामध्ये वट सावित्रीची कथा वाचणे महत्त्वाचे आहे.

Vat Purnima 2024 Muhurt: यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
Magh Purnima 2024 : माघ पौर्णिमेला सकाळी करा या गोष्टी, आर्थिक चणचण पासून राहाल दूर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com