Dhule Wedding News: वट पोर्णिमेच्या दिवशी रंगला अनोखा विवाह सोहळा! धुळ्यातील लग्नाची होतेयं तुफान चर्चा; काय आहे प्रकरण?

Vat Pornima Savitri Vrat 2023: या विवाह सोहळ्यात या दोघा वधुवराने चक्क वडालाच साक्ष मानत वडाला सात फेऱ्या मारून लग्न गाठ बांधली आहे.
Viral Wedding News Dhule
Viral Wedding News DhuleSaamtv

Nyahalod Unique Wedding News: आज सर्वत्र वटपोर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. वटसावित्री ह पती-पत्नीच्या नात्याचा सण मानला असतो. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

या वटपौर्णिमेच्या दिवशी पत्नी आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा व्रत करते. एकीकडे सर्वत्र वट पोर्णिमा साजरी केली जात असतानाच धुळ्यामध्ये याच मुहुर्तावर एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. ज्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. (Dhule Latest News)

Viral Wedding News Dhule
Nagpur Temple Dress Code: भक्तांप्रमाणे मंदिरातील पुजाऱ्यांनाही ड्रेस कोड लागू करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

धुळ्यात रंगला अनोखा विवाह सोहळा....

याबाबत अधिक माहिती अशी की, वटसावित्री पौर्णिमेनिमित्त आज सर्वत्र वडाची पूजा करून लग्न झालेल्या सुहासिनी हाच पती पुढील सात जन्म मिळो तसेच नवऱ्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करीत आहेत. तर दुसरीकडे वडालाच साक्ष माणून वडाभोवती सात फेऱ्या मारून अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा धुळ्यात पार पडला आहे. या अनोख्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

वडाला फेऱ्या मारुन बांधली लग्नगाठ...

वडसावित्री पौर्णिमेच्या दिवशी धुळ्यातील (Dhule) न्याळोद या ठिकाणी काजल व राहुलचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात या दोघा वधुवराने चक्क वडालाच साक्ष मानत वडाला सात फेऱ्या मारून लग्न गाठ बांधली आहे. आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी काजलने व तिच्यासोबत राहुलने थेट वडाभोवतीच सात फेऱ्या मारून लग्न केले आहे.

Viral Wedding News Dhule
Vaijapur News: एवढी हिंमत होतेच कशी? तपासासाठी आलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; जमावाने २ आरोपींना पळवले
Dhule Wedding News
Dhule Wedding NewsSaamtv

या दोघांनीही जोडीदाराच्या दीर्घायुष्यासाठी वडालाच साकडे घातले आहे. या अनोख्या विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा होत आहे. या अनोख्या लग्न सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईक व परिजन मंडळींनी वधु वरांचे कौतुक केले आहे.

संविधानाला साक्षी मानून बांधली लग्नगाठ...

दरम्यान, अमरावतीमध्येही दोन दिवसांपूर्वी अशाच एका अनोखा लग्नसोहळा चर्चेत आला होता. पोहरा गावातील तरूणी प्रांजल धनराज बडोलेचा विवाह अमरावती जिल्ह्यातील पंकज धनराज पाटील यांच्याशी जुळला.विचाराने प्रगल्भ असलेल्या ‘या’ नव विवाहीत दाम्पत्यानं भारतीय संविधानाला साक्ष मानून आदर्श विवाह केला होता, ज्याची चांगलीच चर्चा झाली होती..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com