Vaijapur News: एवढी हिंमत होतेच कशी? तपासासाठी आलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला; जमावाने २ आरोपींना पळवले

Attack On Mumbai Police In Vaijapur: 30 ते 35 जणांनी लाठ्या काठ्या घेऊन हा हल्ला केला. या प्रकरणात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत...
Vaijapur Police Station
Vaijapur Police StationSaamtv

नवनीत तापडिया, प्रतिनिधी....

Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये पोलिसांवर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला असून या प्रकरणात १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vaijapur Police Station
Shiv Sena आक्रमक, Last Warning देत शिवसैनिकांनी संजय राऊतांना हात पाय ताेडण्याची दिली धमकी

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस भरती घोटाळ्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी मुंबई पोलिस (Mumbai Police) दलातील कर्मचारी छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये गेले होते. यावेळी पोलिसांवर जमावाकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला. यावेळी पोलीस पथकावर हल्ला करत ताब्यातील दोन संशयित आरोपींना पळवून देखील नेल्याचे समोर आले आहे.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून 30 ते 35 जणांनी लाठ्या काठ्या घेऊन हा हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

Vaijapur Police Station
Video: बापरे! महिलांकडून पूजा करताना वडाच्या झाडाला लागली आग; मंदिर परिसरातील यंत्रणेची एकच तारांबळ

१० जणांवर गुन्हा दाखल...

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या तक्रारीवरून वैजापूर (Vaijapur Police Crime) पोलिसात एकूण 10 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या सर्व हल्लेखोरांचा तपास घेत आहेत. थेट पोलिसांवर हल्ला केल्याने या घटनेविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. (Crime News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com