- सुशिल थाेरात, लक्ष्मण साेळुंके, सिद्धेश म्हात्रे, तबरेज शेख
Shiv Sena News : खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे (mp shrikant shinde) यांच्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता खासदार संजय राऊत (mp sanjay raut) हे थुंकले. त्यांच्या या कृतीचा राज्यभर शिवसैनिक (shivsainik) निषेध नाेंदवू लागले आहेत. सांगाेला (sangola), नवी मुंबई (navi mumbai), नगर (nagar), अंबरनाथ (ambernath) आदी ठिकाणी आज शिवसैनिकांनी संजय राऊत यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळणे, फाेटाेवर काळ फासणे आदी प्रकारे निषेध नाेंदविला आहे. (Maharashtra News)
नवी मुंबईत आंदाेलन
नवी मुंबई शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्या फाेटाेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी संजय राऊतांच्या फोटोला जोडे मारत, संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी माेठ्या संख्येने शिवसैनिक आंदाेलनात सहभागी झाले हाेते.
नगरला जाेडे माराे आंदाेलन
नगर येथे शिवसेनेच्या वतीने संजय राऊत यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. संजय राऊत यांनी यापुढे काहीही वक्तव्य केल्यास राऊतांचे हातपाय तोडू अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेच्या पदाधिका-यांकडून आंदोलना दरम्यान देण्यात आली आहे.
नाशकात राऊतांना इशारा
नाशिक येथे देखील शिवसेनेकडून आज जोरदार आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेवर शिवसैनिकांकडून जोडे मारण्यात आले. तसेच त्यांची प्रतिमा रस्त्यावर टाकून तुडवण्यात आली.
यावेळी शिवसैनिकांकडुन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही वाईट प्रवृत्ती असून महाराष्ट्राचे राजकारण खालच्या पातळीला या माणसाने नेले अशी टीका जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली.
संजय राऊत यांना ही लास्ट वोर्निंग असून त्यांनी जर यापुढे असले प्रकार केले तर त्यांना रस्त्यावर फिरून नाही देणार असा इशारा महानगर प्रमुख बंटी तिदमे यांनी दिला आहे.
जालन्यात आंदाेलन
जालन्यात शिवसेनेच्या वतीने अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली संजय राऊत यांच्या त्यांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी करण्यात आला.
ज्या ज्या पद्धतीने संजय राऊत यांनी वर्तन केलं त्यांच्या या वर्तनाचा संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. कोणताही सभ्य माणूस असा कृत्य करू शकत नाही असे अर्जुन खोतकर यांनी यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.