Nashik News : नाशिक जिल्ह्यातील 'या' गावात राजकीय पुढा-यांना गाव बंदी, ग्रामसभेचा ठराव; जाणून घ्या नेमकं कारण

शेतमाल पिकवून त्यास भाव नसल्याने तो फेकून देण्याची वेळ शेतक-यावर आली आहे.
dhaiwad grampanchayat, nashik news
dhaiwad grampanchayat, nashik newssaam tv

- अजय सोनवणे

Nashik News : कांद्यासह अन्य शेतमालाला भाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या शेतक-यांनी आता राजकीय पुढा-यांना गाव बंदीचा निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने त्याबाबतचा ठराव केला आहे. यामुळे आगामी काळात कांद्याचा दरासाठी शेतकरी आणखी आक्रमक हाेणार अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra News)

dhaiwad grampanchayat, nashik news
Nanded Banana Price Dropped: केळीचा भाव गडगडला, अवकाळी, गारपीटाच्या संकटानंतर शेतकरी आर्थिक गर्तेत

गेल्या दाेन महिन्यांपासून कांद्याचे दर पडले (onion price drop) असून 2 रुपये ते 6 रुपये प्रतिकिलो सरासरी कांद्याला भाव मिळत आहे. कांद्याचे भाव पडल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत आहे. कांदा उत्पादनाचा खर्च देखील निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शेतकरी रस्त्यावर उतरुन आंदाेलन छेडत सरकारकडे कांद्याला दराची मागणी करीत आहेत.

dhaiwad grampanchayat, nashik news
Gadchiroli News : तेंदूफळींची जाळपोळ, दरवाढीसाठी नक्षल्यांची छत्तीसगड सीमेवर प्रशासनास धमकी

दरम्यान शेतमाल पिकवून त्यास भाव नसल्याने तो फेकून देण्याची वेळ आल्याने शेतक-यांची व्यथा लोकप्रतिनीधी, राजकीय पुढारी कोणीही शासन दरबारी मांडत नसल्याने नाशिकच्या देवळा तालुक्यातील दहिवड ग्रामपंचायतीने ग्रामसभा (dhaiwad grampanchayat) घेत गावात राजकीय पुढा-यांना गावबंदीचा ठराव मांडला.

dhaiwad grampanchayat, nashik news
Shivrajyabhishek Sohala 2023 : छत्रपतींची पालखी पाेहचताच 'तुमचं आमचं नातं काय ?, जय जिजाऊ जय शिवराय' घाेषणांनी राजसदर दुमदुमला (पाहा व्हिडिओ)

हा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर गावात पुढा-यांना गावबंदी असा फलक लावण्यात आला. जिल्हयातील अनेक ठिकाणी आता राजकीय पुढा-यांना गावबंदीचे फलक लावण्यास यापुर्वी पासूनच सुरुवात झाली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com