Nanded News, Banana
Nanded News, Bananasaam tv

Nanded Banana Price Dropped: केळीचा भाव गडगडला, अवकाळी, गारपीटाच्या संकटानंतर शेतकरी आर्थिक गर्तेत

Banana Price Dropped In Nanded: शासनाने शेतक-यांना मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Published on

- संजय सूर्यवंशी

Nanded Banana Farmers News : नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरची केळी प्रसिद्ध आहेत. सध्या केळी काढणीला आली आहे. परंतु केळीचे भाव अचानक घसरल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. (Maharashtra News)

अर्धापूर (ardhapur) येथील शेतकरी केळीचे माेठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. अर्धापूर येथील केळींना राज्यभरातून माेठी मागणी असती. सध्या केळी काढणीला आली आहेत परंतु त्याला याेग्य दर मिळत ऩसल्याचे चित्र आहे. वर्षभर केळीला बाविशे ते अडीच हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता.

Nanded News, Banana
Mumbai Goa Highway News : वाहतुकदारांनाे ! मुंबई गोवा महामार्गावर चार दिवस अवजड वाहनांना बंदी; जाणून घ्या कारण

सध्या केळी काढणीला आली असताना बाजारात केळीला भाव प्रती क्विंटल पाचशे ते सहाशे रुपये मिळतोय. त्यामुळे नांदेड (nanded) जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात नांदेड जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली.

अवकाळीचा देखील केळीला मोठा फटका बसला आहे. अवकाळीच्या तडाख्यातून काही प्रमाणात केळीचे पीक वाचले आहे. परंतु आता केळी काढणीला आल्याने अचानक भाव पडल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने केळी उत्पादक शेतक-यांना मदत करावी अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करु लागले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com