जेष्ठ नागरिकाची हत्या
Nagpur Crime NewsSaam Tv

Nagpur Crime News: दारूची नशा भोवली! वकील बाप आणि लेकानं ज्येष्ठ नागरिकाची केली हत्या, परिसरात खळबळ

Son And Father Killed Senior Citizen: नागपूरमध्ये वकील बाप आणि लेकानं जेष्ठ नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांनी दारूच्या नशेत हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे.
Published on

पराग ढोबळे, साम टीव्ही नागपूर

नागपूरमध्ये वकील बाप लेकानं दारूच्या नशेत जेष्ठ नागरिकाची हत्या केल्याची घटना घडली आहे. दारू पिताना झालेल्या वादात वयोवृद्धाची हत्या झाली आहे. जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नागपूरात मोठी खळबळ उडासली आहे. या आरोपी बाप लेकाला अटक करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, पेशाने वकील असलेले अश्विन वासनिक मृतक हरीश कराडे यांचे कामगार न्यायालयात प्रकरण सांभाळत होते. दोघेही एकाच भागात राहत असल्यामुळे त्यांची मैत्री होती. एकमेकांकडे येणं जाणं सुरू होतं. घटनेच्या दिवशीही सोमवारी पहाटे (२७ मे) हरीश कराडे अश्विनच्या घरी रात्री दारू प्यायला बसलेले (Nagpur Crime News) होते.

दरम्यान दारू पीत असताना हरीश आणि अश्विन या दोघांमध्ये वाद झाला. अश्विन वासनिकचा मुलगा अविष्कार हा सुद्धा तेथे आला. या वकील बाप लेकाने मिळून हरीशला कुऱ्हाडीने लोखंडी दांड्याने जोरदार मारहाण (Son And Father Killed Senior Citizen) केली. यात हरीश कराडेचा मृत्यू झालाय. हरीश दिवाकर कराडे, असं मृतक व्यक्तीचं नाव आहे. ते वायूसेनेतून निवृत्त झाल्यानंतर एका कंपनीत काम करत होते.

जेष्ठ नागरिकाची हत्या
Son killed mother : बायकोसोबत मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलली; रागाच्या भरात मुलाकडून धारदार शस्त्राने हत्या

दारू पिताना झालेल्या वादात वकील आणि त्याच्या मुलाने लोखंडी पाईपने मारहाण (killed) केली. यामध्ये साठ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा हत्या झाल्याची घटना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पहाटे तीन साडेतीनच्या सुमारास आमच्या पथकाला घटनास्थळी एक व्यक्ती बेशुद्ध पडल्याची माहिती मिळाली होती.

घटनास्थळी पोलीस गेले असता मृतदेह आढळून ( crime news) आला. त्याच्या हातावर जखमांच्या खुणा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीत या दोघांना अटक केल्याची माहिती जरीपटका विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी दिली आहे.

जेष्ठ नागरिकाची हत्या
Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com