Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ

'General Hospital' Actor Johnny Wactor Killed : 'जनरल हॉस्पिटल' फेम जॉनी वेक्टर याची वयाच्या ३७ व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे.
Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ
'General Hospital' Actor Johnny Wactor KilledSaam Tv

हॉलिवूड सिनेसृष्टीतून एक दुख:द बातमी समोर येत आहे. 'जनरल हॉस्पिटल' फेम जॉनी वेक्टर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. अभिनेत्याची वयाच्या ३७ व्या वर्षी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याची शनिवारी मध्यरात्री हत्या करण्यात आलेली आहे. वेक्टरच्या निधनाचे वृत्त त्याच्या आईने दिलेले आहे. त्याच्या निधनामुळे हॉलिवूड इंडस्ट्रीत शोक व्यक्त केला जात आहे.

Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ
Aastad Kale News : "नशीबाने अस्ताद नावाचा कोणीही सुलतान झालेला नाही...", नावावरून ट्रोलिंग होण्याबद्दल अस्ताद काळेचं परखड मत

मीडिया रिपोर्टनुसार, शनिवारी मध्यरात्री मित्रांसोबत फिरायला गेला होता. यावेळी त्याच्या एका मित्राचे लक्ष अभिनेत्याच्या कारकडे गेले. कारजवळ तीन अज्ञात व्यक्ती उपस्थित होते. ते त्या कारमधून कॅटॅलिटिक कन्व्हर्टर चोरण्याचा प्रयत्न करत होते. याचवेळी अभिनेत्यावर त्यापैकी एकाने गोळ्या झाडल्या.

Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ
Dalljiet Kaur Divorce : दलजीतला दुसऱ्या पतीनेही दिला धोका, थेट लग्न मान्य करण्यास नकार, कारणही सांगितलं

मुलाच्या निधनानंतर अभिनेत्याच्या आईने एक मुलाखत दिली आहे. त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की, "जॉनी वेक्टरवर गोळ्या झाडल्यानंतर त्या चोरट्यांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी अद्याप कोणत्याही आरोपीला पकडलेले नाही." जॉनी वेक्टर हॉलिवूड इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे त्याच्या परिवारासह मित्र मंडळींवर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याच्या पश्चात त्याची आई आणि त्याचे दोन भाऊ आहेत.

Johnny Wactor Killed : धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याला भररस्त्यात गोळ्या घालून संपवलं; सिनेसृष्टीत खळबळ
TRP Ratings Of Marathi Serial : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकांचा टीआरपी वाढला; ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटरलरला’ची क्रेझ वाढली

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com