Dalljiet Kaur Divorce : दलजीतला दुसऱ्या पतीनेही दिला धोका, थेट लग्न मान्य करण्यास नकार, कारणही सांगितलं

Dalljiet Kaur And Nikhil Patel Divorce : लग्नाच्या १० महिन्यानंतर आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. दलजीतने इन्स्टा स्टोरी शेअर करत निखिलवर गंभीर आरोप केले आहेत.
Dalljiet Kaur Divorce : दलजीतला दुसऱ्या पतीनेही दिला धोका, थेट लग्न मान्य करण्यास नकार, कारणही सांगितलं
Dalljiet Kaur And Nikhil Patel DivorceSaam Tv

सुप्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. तिने जून २०२३ मध्ये दुसरं लग्न केलं होतं. केनियामध्ये राहणाऱ्या उद्योगपती निखिल पटेलसोबत लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या १० महिन्यानंतर आता त्यांच्या घटस्फोटाची चर्चा रंगली आहे. अभिनेत्रीने इन्स्टा स्टोरी शेअर करत तिच्या दुसऱ्या पतीवर काही गंभीर आरोप केले आहेत. पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दलजीत आणि केनियाच्या घटस्फोटाच्या चर्चा होत आहेत. आता तिने या प्रकरणावर मौन सोडलं आहे.

Dalljiet Kaur Divorce : दलजीतला दुसऱ्या पतीनेही दिला धोका, थेट लग्न मान्य करण्यास नकार, कारणही सांगितलं
TRP Ratings Of Marathi Serial : ‘झी मराठी’च्या नव्या मालिकांचा टीआरपी वाढला; ‘पारू’, ‘शिवा’, ‘नवरी मिळे हिटरलरला’ची क्रेझ वाढली

दलजितने निखिलवर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला आहे. निखिल त्यांचे लग्न मान्य करत नसल्याचे ती म्हणाली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये, दलजित म्हणाली, "माझ्या मुलाच्या आणि माझ्या सर्व वस्तू माझ्या सासरी आहेत. ते माझे घर आहे, म्हणूनच आमच्या वस्तू तिथे आहेत ना ? पण निखिल म्हणतोय की, हे माझं घर नाही. तो म्हणतोय की, आमचं लग्न झालेलं नाही. तो माझा पती नाही ?, आम्ही लग्न केलेले नाही ?" अभिनेत्रीने काही तासांपूर्वी इन्स्टास्टोरीवर तिचा लग्नाचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना " माझं निखिलसोबत लग्न झालेलं नाही ?, माझ्या नवऱ्याचं घर माझं नाही ?" असा प्रश्न विचारला आहे.

Dalljiet Kaur And Nikhil Patel Divorce
Dalljiet Kaur And Nikhil Patel DivorceInstagram

अभिनेत्रीच्या ह्या स्टोरीवरून अनेक युजर्सने तिला समर्थन दिलेलं आहे. अनेकांनी तिला समर्थवर कारवाई व्हायला हवी, मागणी केलेली आहे. अभिनेत्रीने निखिलसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवरून डिलीट केले आहे.

दलजित आपल्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिली आहे. तिचं पहिलं लग्न अभिनेता शालिन भानोतसोबत झालेले होते. पण ते दोघेही फक्त दोन वर्षातच विभक्त झाले. त्यांना त्यांना जेडन नावाचा मुलगा आहे. त्याचा सांभाळ दलजित करते.

तर गेल्या वर्षी जून २०२३ मध्ये मुंबईत दलजितने निखिल पटेलसोबत लग्न केले होतं. त्याचं ही दलजितसोबतचं दुसरं लग्न आहे. पहिल्या पत्नीकडून निखिलला दोन मुली आहेत.

Dalljiet Kaur Divorce : दलजीतला दुसऱ्या पतीनेही दिला धोका, थेट लग्न मान्य करण्यास नकार, कारणही सांगितलं
Sagar Karande : 'चला हवा येऊ द्या'नंतर सागर कारंडेची लागली लॉट्री, लवकरच दिसणार 'या' हिंदी कार्यक्रमांत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com