Son killed mother : बायकोसोबत मोबाईलवर बोलताना आई मध्येच बोलली; रागाच्या भरात मुलाकडून धारदार शस्त्राने हत्या

Son killed mother in kolhapur : कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे.
kolhapur news
kolhapur news Saamtv

रणजीत माजगावकर, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापुरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बायकोसोबत बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने त्याच्या आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

kolhapur news
Parbhani Crime News : परभणी हादरलं! शेतीच्या वादातून सख्ख्या भावाचा खून

मुलाकडून आईची हत्या

पत्नी बरोबर मोबाईलवर बोलत असताना आई मध्येच बोलल्याच्या रागातून मुलाने केली आईची हत्या केली आहे. कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे कौटुंबीक वादातून ही धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी स्वत:च्या आईची हत्या करणाऱ्या सादिक मुजावरला राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे. शहनाज मुजावर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे. मुलाने आईच्या छाती, पोट आणि पाठीवर धारदार वार करून हत्या केली.

kolhapur news
Pune Crime : चोरट्यांनी लांबवीले ७८२ ग्रॅम दागिने; पुण्यातील प्रख्यात डॉक्टरच्या घरात चोरी

नेमकं काय घडलं?

कोल्हापूरच्या साळोखे पार्क येथे हे कुटुंब राहत होते. या कुटुंबात वाद व्हायचे. याचदरम्यान, कोल्हापूरमधील सादिक मुजावर हा बायकोसोबत बोलत होता. त्यावेळी त्याची आई शहनाज मुजावर यांनी मध्येच बोलल्या. यामुळे मुलगा सादिकला राग आला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. सादिकने आईच्या छाती, पोट आणि पाठीवर धारदार श्त्राने वार केले. या मारहाणीत त्याची आई शहनाज मुजावरचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी राजारामपुरी पोलिसांनी अटक केली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com