Vasai Crime News: बायकोसोबत फ्लर्ट करायचा; नवऱ्याला राग आला, मित्राला संपवलं!

Mumbai News: बायकोसोबत फ्लर्ट केल्याने मित्रानेच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण विरारमध्ये उघडकीस आले आहे. या प्रकरणी विरार पोलिसांनी आरोपी मित्राला अटक केली आहे.
तरूणाची हत्या
Ahmednagar Crime NewsSaam Tv

एका मैत्रीचा भयंकर शेवट झाल्याची घटना उघड झालीय. विरारमध्ये ही घटना घडलीय. बायकोशी फ्लर्ट करतो म्हणून राग आल्यानं तिच्या नवऱ्यानं मित्राची हत्या केली. त्यानंतर त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

तरूणाची हत्या
Mumbai Crime News: दीड वर्षाच्या चिमुकल्याची हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला; निर्दयी पत्नी-पत्नीला अटक, मुंबईतील संतापजनक घटना

विरार पोलिसांनी गुरुवारी आरोपी गोविंदला अटक केली. पत्नीसोबत फ्लर्ट करतो म्हणून त्यानं आपला मित्र रमेशची हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. एप्रिलमध्येच ही घटना घडली होती. रमेशच्या हत्येनंतर आरोपीनं त्याचा मृतदेह वसई (vasai)पूर्वेकडील साईनाथ नगरमधील डोंगरवार परिसरात फेकून दिला होता.

२३ एप्रिल(april) रोजी रमेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाइकांनी केली होती. जवळपास महिनाभरानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला होता. दुसरीकडे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मृतदेह पूर्ण कुजलेला असल्यानं पोलिसांसमोर त्याची ओळख पटवण्याचे आव्हान होते. चौकशी केल्यानंतर हा मृतदेह रमेशचा असल्याचं स्पष्ट झालं.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. तपास केल्यानंतर संशयाची सुई रमेशचा मित्र गोविंदवर गेली. पोलिसांनी खनियाकडे चौकशी केली. त्यावेळी हत्येची कबुली दिली, असे सांगण्यात येते. चौकशीत गोविंदनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे मित्र होते. रमेश त्याच्या बायकोशी फ्लर्ट करत असल्याचा राग गोविंदच्या मनात होता. दोघांमध्ये यावरून भांडण झालं. यात रमेशला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

तरूणाची हत्या
Sambhajinagar Crime News | संभाजीनगरमध्ये दोन मुलांकडून जन्मदात्या बापाची हत्या, धक्कादायक कारण आले समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com