काश्मीर मधील निसर्गसौंदर्य पर्यटक प्रेमींना भुरळ पाडते. सुट्टीच्या काळात अनेक पर्यटकप्रेमी काश्मीरला फिरण्याचा प्लान करतात. कडाक्याच्या उन्हात तुम्हाला थंडगार गारवा अनुभवायचा असेल तर IRCTC च्या भन्नाट टूर पॅकेज पाहू शकता.
एप्रिल महिन्यात कडक ऊन असते, या काळात आपण फिरण्यासाठी थंड असं ठिकाणं शोधत असतो. या महिन्यापासून आपल्याला सर्वत्र बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवीगार झाडी दिसू लागतात. जर तुम्ही देखील कश्मीरला (Kashmir) जाण्याचा आणि फिरण्याचा प्लान करत असाल तर आयआरसीटीसाचा (IRCTC) टूर प्लान पाहा. कमी बजेटमध्ये तुम्ही येथील निसर्गसौंदर्य आणि सुंदर नजारे पाहू शकता. किती खर्च येईल, बजेट (Budget) आणि बुकिंग प्रोसेस कशी असेल पाहूया.
Jannat-e-Kashmir ex indore
५ रात्री आणि ६ दिवस
फ्लाइट मोड
गुलमर्ग, पहलगाम, श्रीनगर, सोनमर्ग
६ जून २०२४
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला राउंड ट्रिप फ्लाइटमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट मिळेल.
राहाण्यासाठी हॉटेलची सुविधा मिळणार आहे.
या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण मिळेल.
या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला सोलो ट्रिप करायची असेल तर तुम्हाला ४७,७०० रुपये (Price) मोजावे लागतील.
कपल्स जाणार असाल तर प्रत्येक व्यक्तीला ४१,७५० रुपये द्यावे लागतील.
जर तुम्ही फॅमिली ट्रिप करत असाल तर प्रति व्यक्तीला ४०,०५० रुपये भरावे लागतील. जर यामध्ये तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्हाला बेडसाठी (5-11 वर्षे) २९,४०० रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय २१,०५० रुपये मोजावे लागणार आहे.
या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.