IRCTC Nepal Package : सुट्टीत पार्टनरसोबत फिरा काठमांडूला, पॅकेजचा खर्च किती? पाहा सविस्तर

Nepal IRCTC Tour: Full Package, Booking Process | उन्हाळ्यात सुट्टीत आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असतो. परंतु, नेमके जायचे कुठे हा प्रश्न अनेकांना असतो. आपल्यापैकी अनेकांना परदेशात फिरण्याची इच्छा असते पण बजेटमुळे फिरता येत नाही.
IRCTC Nepal Package
IRCTC Nepal PackageSaam Tv

IRCTC Tour Package For Nepal:

उन्हाळ्यात सुट्टीत आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करत असतो. परंतु, नेमके जायचे कुठे हा प्रश्न अनेकांना असतो. आपल्यापैकी अनेकांना परदेशात फिरण्याची इच्छा असते पण बजेटमुळे फिरता येत नाही.

जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर IRCTC ने नेपाळचा प्लान पर्यटकप्रेमींसाठी आणला आहे. पॅकेज किती दिवसांचे आहे. किती पैसे (Money) खर्च करावे लागतील जाणून घेऊया.

पॅकेजचे नाव - Best of Nepal Ex Delhi

पॅकेज कालावधी- 5 रात्री आणि 6 दिवस

प्रवास मोड- फ्लाइट

फिरण्याचे ठिकाण- काठमांडू, पोखरा

प्रवास कधी करु शकाल?

२३ मे २०२४ आणि १५ जून २०२४

1. या प्लानमध्ये काय मिळेल?

  • तुम्हाला यामध्ये राउंड ट्रिपसाठी (Trip) इकॉनॉमी क्लासची तिकिटे मिळतील.

  • राहाण्यासाठी हॉटेलची सुविधा असेल.

  • या पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवणही मिळणार आहे.

  • तसेच यामध्ये ट्रॅव्हल इन्शुरन्सची सुविधा मिळेल.

  • या ट्रिपमध्ये तुम्हाला टूर गाईडन्सही मिळेल.

IRCTC Nepal Package
IRCTC Char Dham Package: IRCTC चा देवदर्शन प्लान! फॅमिलीसोबत चारधाम यात्रा करण्याची संधी, इतका येणार खर्च

2. खर्च किती येईल?

  • जर तुम्ही सोलो ट्रिप करत असाल तर तुम्हाला ५३,६०० रुपये खर्च करावे लागतील.

  • कपल्ससाठी प्रति व्यक्तीला ४५,९०० रुपये भरावे लागतील.

  • तर तिघांसाठी प्रति व्यक्तीला ४४,६०० रुपये भरावे लागणार आहे. यामध्ये तुमच्यासोबत लहान मुले असतील तर ४४,६०० रुपये द्यावे लागतील आणि बेडशिवाय तुम्हाला ४१,४०० रुपये मोजावे लागतील.

IRCTC Nepal Package
Ayodhya Varanasi Tour Package: IRCTC चा नवा टूर पॅकेज! अयोध्या, वाराणसीसह फिरता येणार ८ धार्मिक स्थळांना; बुकिंग खर्च पाहा

3. बुकिंग प्रोसेस

या टूर पॅकेजसाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. याशिवाय तुम्हाला IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com