महेंद्र वानखेडे
वसई : पाणी व शिकारीच्या शोधात वस्तीच्या परिसरात आलेल्या बिबट्यामुळे परिसरात दहशत पसरली होती. (Vasai) वसई किल्ल्यात शिरलेल्या या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून (forest Department) मागील २५ दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. दरम्यान हा बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. (Tajya Batmya)
उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगल भागातून वन्य प्राणी पाणी किंवा शिकारीच्या शोधात शहर, वस्तीच्या भागात येत असतात. अशाच प्रकारे वसई किल्ला परिसरात एक बिबट्या आला होता. या बिबट्याने एका मोटरसायकलला धडक दिली होती. तेव्हापासून (Leopard) बिबट्या वसई किल्ल्यात लपला होता. यामुळे किल्याच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिक जीव मुठीत धरून राहत होते, मात्र अनेक जाणकारानी बिबट्याच नाही; असे मत देखील व्यक्त केलं होत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
२५ दिवसांनंतर पिंजऱ्यात
वसई किल्ला परिसरात बिबट्या असल्याचे समजल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यासाठी येथे पिंजरा देखील लावण्यात आला होता. मागील २५ दिवसापासून वन विभाग बिबट्याचा शोध घेत होते. मात्र बिबट्या किल्ल्यातील भुयारात लपला होता. भुयाऱ्याच्या दोन्ही बाजूला पिंजरा लावण्यात आला होता. पहाटे पाणी किवा शिकारीसाठी बाहेर येण्याचा प्रयत्न करताना बिबट्या आज पहाटे ३.३० च्या सुमारास पिंजऱ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.