Osmanabad Lok Sabha : उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी ३१ उमेदवार रिंगणात; चार जणांनी घेतला अर्ज मागे

Dharashiv News : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले जात असून माघारीच्या दिवसानानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील याचे चित्र स्पष्ट होत आहे
Osmanabad Lok Sabha
Osmanabad Lok SabhaSaam tv
Published On

बालाजी सुरवसे 
धाराशिव
: उस्मानाबाद लोकसभेच्या निवडणुकीसाठी ३५ जणांनी नामनिर्देशनपत्र भरुन दंड थोपटले होते. मात्र (Dharashiv News) सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीत चार जणांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात ३१ उमेदवार राहीले आहेत.  (Latest Marathi News)

Osmanabad Lok Sabha
Sangamner Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये महिलांनी ओढला हनुमान रथ, महिलांच्या पराक्रमाची साक्ष

लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election) रणधुमाळी सुरु झाली आहे. रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांकडून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले जात असून माघारीच्या दिवसानानंतर नेमके किती उमेदवार रिंगणात राहतील याचे चित्र स्पष्ट होत आहे. यात लोकसभेच्या (Osmanabad) उस्मानाबाद मतदार संघात ३५ इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले होते. दरम्यान या लोकसभा मतदार संघासाठी २२ एप्रिल माघारीचा अंतिम दिवस होता. या दिवशी ४ जणांनी आपले अर्ज मागे घेतले असल्याने येथील चित्र आता स्पष्ट झाले आहे. 

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा) -

Osmanabad Lok Sabha
Unseasonal Rain: अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात 17 बळी; 15 हजार शेतकरी बाधित, 26 तासांपेक्षा अधिक काळ बत्तीगुल

आता ३५ उमेदवार रिंगणात असून त्यांच्यात लढत होणार आहे. दरम्यान शिक्षक आमदार विक्रम काळे, बाळकृष्ण शिंदे, रहिमोद्दीन काझी, करून जाधवर यांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांनी शिट्टी या चिन्हासाठी प्राधान्य दिले होते. मात्र ते चिन्ह त्यांना मिळु शकले नाही. त्यांना प्रेशर कुकर हे चिन्ह देण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com