Sangamner Hanuman Jayanti 2024 : संगमनेरमध्ये महिलांनी ओढला हनुमान रथ, महिलांच्या पराक्रमाची साक्ष

Hanuman Jayanti Latest Marathi News : हा मान मिळविण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी संगमनेर शहरात गर्दी करतात. आज माेठ्या उत्साहात हनुमान रथ साेहळा पार पडला.
sangamner women lead the hanuman rath yatra on occasion of hanuman jayanti
sangamner women lead the hanuman rath yatra on occasion of hanuman jayantiSaam Digital

- सचिन बनसाेडे

Nagar :

"बलभीम हनुमान की जय" अशा घाेषणा देत आज (मंगळवार) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात शेकडाे महिलांनी हनुमानाचा रथ ओढला. देशभरात हनुमान जयंती उत्साहात साजरी हाेत असताना आज ब्रिटीश काळापासून असलेली परंपरा आजही संगमनेरकरांनी जोपासली. या निमित्त हनुमान जयंतीचा उत्साह संगमनेर शहरात दिसून आला. (Maharashtra News)

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात साज-या  होणा-या हनुमान जन्मोत्सवाला आगळं  वेगळ महत्व आहे. या ठिकाणी निघणा-या रथ यात्रेत बजरंगबलीचा रथ ओढण्याचा मान महिलांना आहे. हा मान मिळविण्यासाठी शेकडो महिला दरवर्षी याठिकाणी गर्दी करतात. आज माेठ्या उत्साहात हनुमान रथ साेहळा पार पडला.

sangamner women lead the hanuman rath yatra on occasion of hanuman jayanti
Abhijit Pakhare UPSC Success Story : जिद्दीच्या जोरावर अभिजित पाखरेंची यशाला गवसणी,चारवेळा अपयश तरीही जिद्द कायम ठेवत यूपीएससी परीक्षेत मिळवलं यश

असा मिळाला महिलांना रथाचा मान

ब्रिटीशांनी रथ यात्रेवर बंदी घालून अनेक तरुणांना ताब्यात घेतले होते. २३ एप्रिल १९२९  रोजी हनुमान जयंतीच्या पहाटे मंदिराभोवती पोलिसांचा गराडा पडला. पोलिस आपल्या सरकारी ताकदीच्या जोरावर मिरवणुकीस करत असलेला विरोध पाहुन नेते मंडळी घरी गेले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

एवढ्यात अचानक २०० ते २५० स्त्रियांनी एकत्र येऊन रथ ताब्यात घेतला. ही बातमी समजताच स्त्रियांची संख्या २०० वरुन ५०० वर गेली. पोलिसांनी स्त्रियांबरोबर अनेक युक्तिवाद केले, भीती दाखवली, अटक करण्याची- खटले भरण्याची धमकीही दिली.

sangamner women lead the hanuman rath yatra on occasion of hanuman jayanti
Jyotiba Chaitra Yatra News : चैत्र यात्रा निमित्त कोल्हापुरातून जोतिबा डोंगरावर विशेष बसची सुविधा, लाखाे भाविकांनी डाेंगर फुलू लागला

सरकारी ताकदीचा रुबाब दाखवला पण आदिशक्तीस्वरुप भारतीय नारींनी आपला उत्सव पार पाडण्याचा निर्धार चालूच ठेवला. याच गडबडीचा फायदा घेत झुंबरबाई अवसक, बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे आणि इतर मुली, स्त्रीयांनी रथावर चढून हनुमान प्रतिमा ठेऊन  "बलभीम हनुमान की जय"चा दणदणीत गजर देऊन कुणालाही काही कळण्याच्या आत रथाचा दोर ओढन्यास सुरुवात केली. त्यानंतर रथ यात्रा पार पडली. सन १९२९ पासून आजतागायत महिला आता रथाची परंपरा जाेपासत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

sangamner women lead the hanuman rath yatra on occasion of hanuman jayanti
Kolhapur Constituency : शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठिंबा, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचे कोल्हापूरकरांना 'हे' आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com