- रणजीत माजगावकर
दख्खनचा राजा श्रीक्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा (Jotiba Chaitra Yatra) सुरू आहे. या यात्रेचा आज (मंगळवार) मुख्य दिवस आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यां बरोबरच कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक चैत्र यात्रेला येऊ लागले आहेत. यंदा देखील लाखाे भाविक दर्शन घेतील असा अंदाज व्यक्त करत प्रशासनाने पूर्ण नियोजन केले आहे. (Maharashtra News)
'जोतिबाच्या नावानं चांगभलं' चा जयघोष करत राज्यभरातील मानाच्या सासनकाट्या ज्योतिबा डोंगरावर पोहोचलेल्या आहेत. गुलाल खोबऱ्याची उधळण करत या यात्रेला प्रारंभ झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आज दुपारी सासन काट्यांची पारंपरिक पद्धतीने मिरवणूक ही निघणार आहे. या चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक दिवसभरात जोतिबाच्या दर्शनाला डोंगरावर हजेरी लावत असतात. या यात्रेनिमित्त जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज आहे. मोठा पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. भाविकांसाठी कोल्हापुरातून विशेष बसेसची सोय देखील ज्योतिबा डोंगरासाठी करण्यात आलेली आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.