Lok Sabha Election 2024 : माढातून शेकापची, सोलापूरात वंचितच्या उमेदवाराची माघार; राहुल गायकवाडांनी सांगितलं धक्कादायक कारण

पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माघार घेण्याबाबत कळवले नसल्याचे देखील राहुल गायकवाड यांनी नमूद केले. राहुल गायकवाड यांनी एक व्हिडिओ प्रसारित करुन मला संविधान वाचवायचे आहे असे स्पष्ट केले.
vanchit bahujan aghadi candidate rahul gaikwad and skp leader sachin deshmukh withdraws of their candidature from solapur and madha constituency
vanchit bahujan aghadi candidate rahul gaikwad and skp leader sachin deshmukh withdraws of their candidature from solapur and madha constituencySaam Digital

Maharashtra Lok Sabha Election 2024 :

माढा लोकसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार सचिन देशमुख यांनी आज (साेमवार) उमेदवारी अर्ज माघार घेतला. शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांच्या पाठोपाठ सचिन देशमुख (sachin deshmukh) यांनीही माढा मतदारसंघातून माघार घेतली. दरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे (vanchit bahujan aghadi) उमेदवार राहुल गायकवाड (rahul gaikwad) यांनी उमेदवारी मागे घेतल्याचे आज जाहीर केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माढा मतदारसंघातून यापूर्वी माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी माघार घेतली. आता सचिन देशमुख यांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशिल माेहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांना त्याचा फायदा हाेईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

vanchit bahujan aghadi candidate rahul gaikwad and skp leader sachin deshmukh withdraws of their candidature from solapur and madha constituency
Kolhapur Constituency: एमआयएमचा पाठिंबा शाहू महाराजांना अडचणीचा ठरेल : राजेश क्षीरसागर

साेलापूरातून वंचितच्या राहूल गायकवाडांची माघार

साेलापूर मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहूल गायकवाड यांनी उमेदवारी मागे घेत असल्याचे आज जाहीर केले. साम टीव्हीशी बाेलताना ते म्हणाले स्थानिक कार्यकारणी मदत करणार नाही हे लक्षात आल्याने मी निवडणुकीतून माघार घेत आहे.

(Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

पक्षातील वरिष्ठ नेत्यांना माघार घेण्याबाबत कळवले नसल्याचे देखील राहुल गायकवाड यांनी नमूद केले. राहुल गायकवाड यांनी एक व्हिडिओ प्रसारित करुन मला संविधान वाचवायचे आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार जाेपासायचा आहे. बाबासाहेबांचे स्वप्न वाचावयाचे आहे. त्यामुळे मी निवडणुकीत माघार घेण्याचे निश्चित केल्याचे गायकवाड यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

vanchit bahujan aghadi candidate rahul gaikwad and skp leader sachin deshmukh withdraws of their candidature from solapur and madha constituency
MNS News : बहुचर्चित ताडी दुकानावर मनसेने चालविला जेसीबी (पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com