Kolhapur Constituency : शाहू महाराज छत्रपतींना एमआयएमचा पाठिंबा, मराठा समन्वयक दिलीप पाटलांचे कोल्हापूरकरांना 'हे' आवाहन

Shahu Maharaj Chhatrapati News : एमआयएमने रविवारी काेल्हापूरात महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले आहे.
maratha leader dilip patil statement on mim support to shahu maharaj chhatrapati in kolhapur constituency
maratha leader dilip patil statement on mim support to shahu maharaj chhatrapati in kolhapur constituencySaam Digital
Published On

- रणजीत माजगावकर

Kolhapur Lok Sabha Election :

कोल्हापुरात एमआयएमची हिरवी लाट आणण्याचा प्रयत्न असून कोल्हापूरचा बेहरमपाडा आणि भिवंडी करायचे आहे असा सवाल मराठा समाजाचे राज्य समन्वयक दिलीप पाटील (maratha samaj coordinator dilip patil) यांनी केला आहे. एमआयएमने शाहू महाराज छत्रपती (shahu maharaj chhatrapati)  यांना पाठिंबा दिल्यानंतर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील शाहू महाराज यांना विनाकारण निवडणुकीच्या रिंगणात उतरविल्याचे सांगत त्यांना एमआयएम आणि वंचितने पाठींबा दिला असला तरी महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (mp sanjay mandlik) हे निवडून येतील असा विश्वास मुश्रीफ यांनी नमूद केला. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

दिलीप पाटील म्हणाले एमआयएम रझाकार आणि निजामाचे वंशज आहेत तर औरंगजेबाच्या थडग्यावर फुले उधळणारे वंचित सुद्धा पाठिंबा देत असेल तर हे मोठे षडयंत्र आहे.आम्हांला निजाम आणि औरंगजेबाचा महाराष्ट्र करायचा नाही. कोल्हापुरात काही दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीचा बदला घेण्याचाही प्रयत्न यातून दिसून येत आहे. कोल्हापूरकरांनी सावध होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

maratha leader dilip patil statement on mim support to shahu maharaj chhatrapati in kolhapur constituency
Maharashtra Lok Sabha Election 2024 : आणखी एक नवा पक्ष लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोल्हापूर, हातकणंगलेसह ९ जागांवर लढवणार निवडणूक

दिलीप पाटील म्हणाले कोल्हापुरात एमआयएमची हिरवी लाट आणण्याचा प्रयत्न असून कोल्हापूरचा बेहरमपाडा आणि भिवंडी करायचे आहे म्हणूनच एमआयएमने शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सीएए बाबत आंदोलनाचे नेतृत्व केल्याने कोल्हापुरात एमआयएमला पोषक वातावरण वाटत आहे. त्यामुळेच हे सगळे सुरू असल्याचा आरोप मराठा आंदोलक दिलीप पाटील यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

maratha leader dilip patil statement on mim support to shahu maharaj chhatrapati in kolhapur constituency
Lok Sabha Election 2024 : नारायण राणेंच्या भेटीनंतर 'ओम गणेश' वर किरण सामंत यांचे महत्त्वपूर्ण विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com