Mira bhayandar News : षटकार मारला अन् मैदानावरच कोसळला, क्रिकेट खेळताना तरुणाचा गेला जीव, मन सुन्न करणारा VIDEO

youth dies of heart attack : मिरा भाईंदरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेट खेळताना तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
षटकार मारला अन् मैदानावरच कोसळला, क्रिकेट खेळताना तरुणाचा गेला जीव, मन सुन्न करणारा VIDEO
Mira bhayandar NewSaam tv

महेंद्र वानखेडे, साम टीव्ही प्रतिनिधी

मिरा-भाईंदर : तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. मिरारोडमध्येही तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. फलंदाजी करताना तरुणाने जोरदार षटकार मारला. त्यानंतर तरुणाला आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिरारोडमध्ये क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिरारोडमधील काशिमीरा परिसरात एका टर्फमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये खेळत असताना तरुणाला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर तरुण खालीच कोसळला. ही संपूर्ण घटना कॅमेफऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणाचा काशीगाव पोलीस तपास करत आहे.

षटकार मारला अन् मैदानावरच कोसळला, क्रिकेट खेळताना तरुणाचा गेला जीव, मन सुन्न करणारा VIDEO
Accident Video: अरे देवा! बाईक रायडर्ससोबत हुल्लडबाजी करताना तरुणींचा अपघात, VIDEO व्हायरल

नेमकं घडलं काय?

एका कंपनीकडून स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कंपनीमधील तरुण टर्फमध्ये एकमेकांच्या विरोधा टर्फ क्रिकेट खेळत होते. सामन्यात फलंदाजी करताना तरुणाने जोरदार षटकार लगावला. त्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण जमिनीवर कोसळला. यातच तरुणाचा मृत्यू झाला.

षटकार मारला अन् मैदानावरच कोसळला, क्रिकेट खेळताना तरुणाचा गेला जीव, मन सुन्न करणारा VIDEO
Viral Cricket Video: मैदानात घुसखोरी करणाऱ्या फॅनला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; रोहितच्या कृत्याने जिंकलं मन - video

तरुण खाली कोसळल्यानंतर इतर तरुण मदतीला धावून आल्याचंही व्हिडिओमध्ये दिसत आहे. तरुणाच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेने कंपनीमधील कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

क्रिकेट खेळताना मुलाचा मृत्यू

पुण्यात काही महिन्यापूर्वी गुप्तांगावर चेंडू लागून एका ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. शौर्य उर्फ शंभू कालिदास खांदवे असे मुलाचे नाव होते. पुण्यातील लोहगावमधील ही घटना होती. या घटनेनंतर विमानतळ पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com