Accident Video: अरे देवा! बाईक रायडर्ससोबत हुल्लडबाजी करताना तरुणींचा अपघात, VIDEO व्हायरल

Girls Stunt Video: रस्त्यावर स्कुटी चालवत स्टंट करताना दोन तरूणींचा अपघात झाला आहे. हा व्हिडिओ उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या X या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे.
 दोन तरूणींचा अपघात
Accident VideoSaam Tv

रस्त्यावरून गाडी चालविताना असताना काळजी घेणे गरजेचे आहे. भरधाव रस्त्यावर स्टंट करताना तरूणींचा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताचा व्हिडिओ उत्तराखंड पोलिसांनी त्यांच्या X अकाउंटवर शेअर केला आहे. या तरूणी विनाहेल्मेट स्कुटीवरून प्रवास करत होत्या. तसंच त्या बाजूने जाणाऱ्या बाईक रायडर्ससोबत स्टंटबाजी करत असल्याचं पाहायला मिळतंय.

भरधाव वेगात सुसाट धावत या तरूणी बाईक राईडर्ससोबत स्टंट करत होत्या. परंतु त्यांना हा स्टंट चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे. भरधाव वेगामुळे त्यांचे स्कुटीवरील नियंत्रण (Accident Video) सुटलं. त्यामुळे त्यांची गाडी खाली पडली. वेगामुळे त्या दोघीही गाडीसह फरफटल्या गेल्या. हा व्हिडिओ एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे.

आपण बघू शकतो, की व्हिडिओमध्ये दोन तरूणी मस्त मजेत आपल्या स्कुटीवरून जात (Girls Stunt Video) आहे. पंछी बनु उडती रहू मस्त गगन में, अशी धून आपल्याला ऐकू येत आहे. एकतर त्या विनाहेल्मेट गाडी चालवत आहे. त्यांनी वाहतूकीच्या नियमांचं उल्लघंन केलं आहे. त्यानंतर भरधाव वेगात काही बाईक रायडर्स येतात. या तरूणी आपल्या स्कुटीवर उभं राहत त्यांना हाय बाय करतात. स्टंटच्या नादात त्यांचा स्कुटीवरचा बॅलन्स बिघडतो अन् त्या खाली (Viral News) कोसळतात.

 दोन तरूणींचा अपघात
Viral Video: महागात पडला रील! मास्तरीन बाईंनं पेपर तपासताना बनवला रील; व्हायरल होताच झाली FIR

उत्तराखंड पोलिसांनी हा तरूणींच्या अपघाताचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. आपल्या गाडीवर स्टंट करून आपला जीव धोक्यात घालू नका. दुचाकी चालवताना नेहमी हेल्मेट घाला, असं आवाहन देखील उत्तराखंड पोलिसांनी (Viral Video) केलंय. त्यांनी असं कॅप्शनच हा व्हिडिओ शेअर करताना दिलं आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे वाहन चालवताना वेग आणि सुरक्षितेची काळजी घेणं गरजेचं आहे.

 दोन तरूणींचा अपघात
Railway Viral Video: अरे बापरे! प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारलं, रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, VIDEO व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com