Railway Viral Video: अरे बापरे! प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारलं, रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी, VIDEO व्हायरल

Railway Staff Beating Passenger At Station: रेल्वे कर्मचारी प्रवाशाला मारहाण करत असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.
रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी
Railway Viral VideoSaam Tv

रेल्वेशी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. यामध्ये रेल्वेतील ट्रेनमधून खाली उतरून कर्मचारी एका प्रवाशाला मारहाण करत असल्याचं दिसत आहे. रेल्वे प्लॅटफॉर्मवर रेल्वेचे कर्मचारी एका प्रवाशाला मारहाण करत असताना दिसत आहेत. रेल्वे प्लॅटफॉर्मवरील हाणामारीचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे.

आता नेटकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया या व्हिडिओवर व्यक्त केल्या जात आहेत. कधी रेल्वेतील गर्दीचे, कधी अपघाताचे, तर कधी रेल्वेत रील्स बनवल्याचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. अनेकदा रेल्वेमध्ये हाणामारी झाल्याच्या घटनाही आपण पाहिल्या आहेत. रेल्वेत प्रवाशामधील भांडणं हा नेहमीचा विषय आहे. परंतु आता रेल्वे कर्मचारी आणि प्रवाशांमध्ये वाद होताना दिसत (Railway Viral Video) आहे. परंतु रेल्वे कर्मचारी थेट ट्रेनमधून उतरून प्रवाशाला मारहाण करत आहेत.

हा व्हिडिओ ४५ सेकंदाचा आहे. राहुल सैनी नावाच्या X अकाउंटवरून हा व्हिडिओ ( Viral Video) शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओमध्ये प्लॅटफॉर्मवर एक प्रवासी उभा असल्याचं दिसतंय. अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांमधील काहीजण ट्रेनमधून खाली उतरतात. या व्यक्तीला लाथाबुक्कीने हाणायला सुरूवात करताना दिसतात. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत (Viral News) आहे.

रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी
Delhi Police Shared Panchayat 3 Video : "शाब्बास! सचिवजी, तुम्ही...", पंचायत सीरिजमधील सीन शेअर करत दिल्ली पोलिसांनी केली अनोखी जनजागृती; Video Viral

आता भारतीय रेल्वेने प्रवाशांना मारहाण करण्यासाठी गुंड ठेवलेत का? असा सवाल या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये विचारला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या कर्मचाऱ्यांवर जीआरपीने तात्काळ कारवाई करण्याची मागणी (Railway Video) नेटकरी करत आहेत. या कर्मचाऱ्यांविरूद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

रेल्वे स्थानकावर कर्मचाऱ्यांची गुंडगिरी
Dombivli Viral News: वृद्धाचा मोबाइल चोरणं पडलं महागात, नागरिकांनी तरुणाला चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com