Dombivli Viral News: वृद्धाचा मोबाइल चोरणं पडलं महागात, नागरिकांनी तरुणाला चोप देत दिलं पोलिसांच्या ताब्यात

Dombivli Manpada Police: एका वृद्ध नागरिकाचा मोबाइल हिसकावून एक तरुण पळ काढत होता. पण त्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. मोबाइल चोरून पळणाऱ्या या चोराला सतर्क नागरिकांनी पकडले आणि त्याला चांगला चोप दिला.
Dombivli Crime News
Dombivli Crime News Saan Tv

अभिजीत देशमुख, डोंबिवली

डोंबिवलीमध्ये (Dombivli) चोरी आणि लुटमारीच्या घटना वाढल्या आहेत. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्याचे दिसून येत आहे. अशामध्ये डोंबिवलीमध्ये मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेलेल्या एका वृद्धाचा मोबाइल हिसकावून आरोपी पळ काढत होता. त्याला पकडून स्थानिक नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवली एमआयडीसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या एका वृद्ध नागरिकाचा मोबाइल हिसकावून एक तरुण पळ काढत होता. पण त्याचा चोरी करण्याचा प्रयत्न फसला. मोबाइल चोरून पळणाऱ्या या चोराला सतर्क नागरिकांनी पकडले आणि त्याला चांगला चोप दिला. त्यानंतर त्यांनी आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात ही घटना घडली . या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झालाय.

Dombivli Crime News
CBSE School : बोगस शाळा संस्कृतीला बसणार चाप, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून कारवाईचा बडगा; महाराष्ट्रातील 2 शाळांचा समावेश

मोहम्मद मन्नान गुलाम नबी शेख असे या चोरट्याचे नाव असून तो मुंब्रा येथे राहतो. पोलिसांनी आरोपीजवळील एक तीक्ष्ण हत्यार जप्त केले आहे. आरोपीसोबत त्यावेळी आणखी एक जण होता पण तो घटनास्थळावरून पळून गेला असल्याची माहिती नागरिकांनी दिली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात या चोरोट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Dombivli Crime News
Pune University : पुणे विद्यापीठाच्या कँटीनमध्ये विद्यार्थ्यांनी घातला गोंधळ; भाजी-चपाती आंबट लागल्याचा आरोप

मानपाडा पोलिसांकडून सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. या आरोपीने याआधी अशाप्रकारच्या किती चोऱ्या केल्या आहेत? याचा तपास पोलिस करत आहे. त्याचसोबत पोलिस या आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराचा देखील शोध घेत आहेत. दरम्यान, घराबाहेर पडणाऱ्या वयोवृद्धांना आणि महिलांना चोरटे टार्गेट करतात. महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी किंवा मोबाईल हिसकावून ते पळून जातात. अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा आरोपींना अटक केल्यानंतर इतरही गुन्ह्यांची उकल होते.

Dombivli Crime News
Vashi News : पाण्याच्या टाकीचं बांधकाम करताना खाली कोसळला; कामगाराचा जागीच मृत्यू; वाशीमधील दु:खद घटना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com