आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सराव सामन्याचा थरार पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी शानदार खेळ केला आणि बांगलादेशवर शानदार विजय मिळवला. या सामन्यात एका फॅनने सुरक्षा रक्षकांना चकवा देत थेट मैदानात प्रवेश केला आणि रोहितला भेटण्यासाठी धाव घेतली. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सराव सामना सुरू होता. त्यावेळी भारतीय संघ क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरला होता. त्यावेळी संधी साधत एका फॅनने सुरक्षारक्षकांना चकवा देत मैदानात एन्ट्री केली. मैदानात आलेल्या फॅनला रोहित शर्माला भेटून त्याला मिठी मारायची होती. मात्र तो मैदानात पोहोचताच, मैदानात तैनात असलेले पोलीस त्याच्या मागे धावत गेले आणि त्याला पकडुन मैदानावरच आडवा पाडला.
रोहित शर्माने पोलीसांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने सपोर्ट स्टाफमधील सदस्याला मैदानात बोलावण्याचाही इशारा केला. मात्र ऐकतील ते अमेरिकेतील पोलीस कसले. त्यांनी रोहित शर्मासमोरच त्या फॅनला बेड्या ठोकल्या. ज्यावेळी अमेरिकेच्या पोलीसांनी त्या फॅनला बेड्या ठोकण्यासाठी मैदानावर पाडलं, त्यावेळी रोहितने पोलीसांना विनंती केली की, त्याला अशी वागणूक देऊ नका. रोहितच्या या कृत्याने क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला होता. भारतीय संघाकडून रिषभ पंतने अर्धशतकी खेळी केली. तर हार्दिक पंड्याने देखील शानदार खेळी करत संघाची ढवांख्या १८२ धावांवर पोहचवली. बांगलादेशला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला १२२ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना ६० धावांनी आपल्या नावावर केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.