Mumbai Crime News: पाणीकपात महिलेच्या जीवावर बेतली; पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला, मुंबईतील खळबळजनक घटना

Husband Attack On Wife Due To Water Cut: मुंबईतील पाणीकपात एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. पाण्यावरून पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केला आहे.
पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
Mumbai Crime NewsSaam Tv

सचिन गाड, साम टीव्ही मुंबई

मुंबईमध्ये पाणी कपात महिलेच्या जीवावर बेतल्याचं समोर आलं आहे. पाणी कपातीमुळे पतीने पत्नीवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. साकीनाका परिसरात ही घटना घडलेली आहे. पतीने पत्नीवर चाकूहल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. साकीनाका पोलिसांनी हल्लेखोर पतीला अटक केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, साकीनाका परिसरात ४२ वर्षीय परमात्मा गुप्ता नावाची व्यक्ती आणि त्याचं कुटुंब राहतं. शनिवारी दुपारी (१ जून) परमात्मा गुप्ता कामावरून घरी आले होते. तेव्हा त्यांना आंघोळ करायची होती. परंतु पालिकेने पाणीकपात केल्यामुळे घरामध्ये पाणी कमी होते. त्यामुळे पत्नीने त्यांना आंघोळीला विरोध केला. त्यामुळे परमात्मा गुप्ता भयंकर (Mumbai Crime News) संतापले.

रागाच्या भरात त्यांनी कांदा कापण्याच्या चाकूने पत्नीच्या पोटात तीन वार केले. पतीने केलेल्या हल्ल्यामध्ये पत्नी मिरा गुप्ता गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. या महिलेवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या (Husband Attack On Wife) आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठी घट झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने ३० मेपासून मुंबईत ५ टक्के पाणीकपात लागु केली आहे.

पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
Shahapur Water Crisis: शहापूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई! पाण्यासाठी महिलांची वणवण; रात्रभर करावा लागतोय विहिरीवर मुक्काम

पाणी कपातीमुळे नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागत (Mumbai Water Crisis) आहे. येत्या ५ जूनपासून ही पाणीकपात १० टक्के केली जाणार आहे. पाणीकपातीच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर पाणी जपून वापरत आहेत. पण हीच पाणीकपात मुंबईत एका महिलेच्या जीवावर बेतली आहे. पाण्यावरून वाद झाला अन् नवऱ्याने बायकोवर थेट चाकूहल्ला केल्याची घटना घडली (Mumbai Water Cut) आहे.

पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला
Mumbai Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; बुधवारपासून १० टक्के पाणीकपात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com