Mumbai Water Supply : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; बुधवारपासून १० टक्के पाणीकपात

Mumbai Water News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात केवळ ७.५९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; बुधवारपासून १० टक्के पाणीकपात
Water Supply Water Level In Mumbai Saam Tv

मुंबईकरांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता आहे. कारण, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. उर्ध्व वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणात सध्या केवळ ७.५९ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; बुधवारपासून १० टक्के पाणीकपात
Weather Forecast : येत्या ४८ तासांत मान्सून महाराष्ट्रात धडकणार; आजपासून पुण्यासह 'या' भागात कोसळणार पाऊस

गेल्या तीन वर्षातील हा सर्वात कमी पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी म्हणजेच २०२३ मध्ये आजच्या दिवशी सातही धरणांमध्ये १२.२८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता. त्याआधीच्या वर्षी जूनमध्ये मुंबईतील धरणांमध्ये १७.०३ टक्के पाणीसाठा होता.

धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने मुंबई महापालिकेने ३० मेपासून ५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. बुधवार ५ जूनपासून या पाणीकपात आणखी भर पडणार असून १० टक्के पाणीकपात लागू होईल, असं महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

मुंबईला दररोज ३८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. सध्या धरणांमधील पाणीसाठा कमा झाल्याने राज्य सरकारने महापालिकेला भातसा आणि उर्ध्व वैतरणा धरणातील पाणी वापरण्यास परवानगी दिली आहे. यातील उर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास सुरुवात झाली आहे.

दुसरीकडे भातसा धरणात केवळ साडेतीन टक्के पाणी शिल्लक आहे. येत्या काही दिवसात या धरणातील राखीव साठ्याचा वापरलाही सुरुवात होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने करावा लागणार आहे. कारण शहराच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आता राखीव पाणीसाठ्यावरच आहे.

कोणत्या धरणात किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

  • उर्ध्व वैतरणा धरणात शून्य टक्के पाणीसाठा आहे.

  • मोडक सागर धरणात १५.५७ टक्के इतका पाणीसाठा आहे.

  • तानसा धरणातील पाणीसाठा २६.१२ टक्क्यांवर आला आहे.

  • मध्य वैतरणा धरणात १०.४३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

  • भातसा धरणातील पाणीसाठा ३.३३ टक्के इतका आहे.

  • विहार धरणात २०.१६ टक्के पाणीसाठा उरला आहे.

  • तुलसी धरणात २८.७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ इतकाच पाणीसाठा; बुधवारपासून १० टक्के पाणीकपात
Mumbai Breaking: मोठी बातमी! मुंबई विमानतळावरून १० किलो सोनं जप्त, कस्टम विभागाची कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com