मस्कुलर डिस्ट्रोफी' हा स्नायूंवर परिणाम करणारा एक गंभीर अनुवांशिक विकार आहे. एमडीचे निदान कुटुंबांवर परिणाम करणारे आहे.याचा मुलाच्या शारीरिक क्षमतेवरच नाही तर त्यांच्या जीवनाच्या गुणवत्तेवरही होतो. आता मात्र रिजनरेटिव्ह मेडिसिनमध्ये झालेल्या प्रगतीमुळे नवीन उपचार पर्याय उपलब्ध आहेत. ज्यामुळे बालरूग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे.
रीजनरेटिव्ह मेडिसिन एक्स्पर्ट आणि स्टेमआरएक्स बायोसायन्स सोल्यूशन्स इंडियाचे संस्थापक डॉ प्रदीप महाजन म्हणाले की, मस्कुलर डिस्ट्रॉफीचा त्रास असलेल्या रुग्णांमध्ये स्नायू कमकुवत होऊ लागतात, ज्यामुळे दैनंदिन कामात अडथळा निर्माण होतो. यामुळे संबंधीत व्यक्तीची गतिशीलता कमी होते. बर्याच प्रकरणांमध्ये, एमडीमुळे अपंगत्व येते, ज्यामुळे पिडीत मुलांना दैनंदिन कामांसाठी देखील इतरांवर अवलंबून रहावे लागते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मस्कुलर डिस्ट्रोफी असलेल्या बालरूग्णांसाठी रिजनरेटिव्ह मेडिसिन हा एक आशेचा किरण ठरत आहे. स्नायूंमधील खराब झालेल्या ऊतकांची दुरुस्ती, नवी ऊती तयार करण्यास मदत करतात. रिजनरेटिव्ह मेडिसिन्स एमडीच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरतात.
स्टेम सेल थेरपी: स्टेम सेल थेरपीमध्ये स्नायूंच्या ऊतींचे पुनरुत्पादन करण्याची क्षमता असते. प्रभावित स्नायूंमध्ये निरोगी स्टेम सेल्सचा वापर करून खराब झालेल्या पेशी दुरुस्त केल्या जातात. यामुळे स्नायूंचे कार्य सुधारण्यात मदत होते. संशोधकांनी केलेल्या अभ्यासांनी आणि क्लिनिकल चाचण्यांनी उत्तमोत्तम परिणाम दाखवले आहेत.
जीन थेरपी: मस्कुलर डिस्ट्रोफीचे काही प्रकार विशिष्ट अनुवांशिक उत्परिवर्तनांमुळे होतात. जीन थेरपी तंत्रामध्ये रोगाचे मूळ कारण शोधण्यासाठी जीन्समधील दोष दुरुस्त करणे किंवा बदलणे यांचा समावेश आहे.
एक्सॉन स्किपिंग: एक्सॉन स्किपिंग हे एक तंत्र आहे ज्याचा उपयोग अनुवांशिक दोष दूर करण्यात होतो . एमडीच्या सर्वात सामान्य आणि गंभीर प्रकारांपैकी एक, ड्यूकेन मस्कुलर डिस्ट्रॉफीसाठी फायदेशीर (Benefits) ठरते. एक्सॉन-स्किपिंग थेरपींचा समावेश असलेल्या क्लिनिकल चाचण्यांनी उत्तम परिणाम दाखवले आहेत, ज्यामुळे प्रभावित मुलांसाठी हा एक आशेचा किरण ठरत आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.