Health Benefits of Walking : रोज सकाळी इतकी पावलं चाला, वजन होईल कमी; रक्तदाबही राहिल नियंत्रणात

Control Weight And Blood Pressure : आरोग्यासाठी नियमितपणे चालणे हे फायदेशीर मानले जाते. परंतु, किती पावलं रोज चालावी हा प्रश्न अनेकांना आहे.
Health Benefits of Walking
Health Benefits of WalkingSaam Tv
Published On

Daily Walk Benefits :

अनेकांना मॉर्निंग वॉकला जाण्याची सवय असते. आरोग्य निरोगी राहाण्यासाठी जितका आहार महत्त्वाचा आहे तितकेच त्याची काळजी घेणे. नियमितपणे व्यायाम किंवा योग केल्याने शरीर निरोगी राहाण्यास मदत होते.

आरोग्यासाठी नियमितपणे चालणे हे फायदेशीर मानले जाते. परंतु, किती पावलं रोज चालावी हा प्रश्न अनेकांना आहे. बरेच लोक १००० पावलं चालण्यावर भर देतात. ग्रॅनडा विद्यापीठातील संशोधनातून असे समोर आले आहे की, मृत्यूचा धोका कमी करण्यासाठी ८००० पावले चालणे पुरेसे आहे. चालण्याने शरीराला नेमके कसे फायदे होतात. जाणून घेऊया ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. दररोज ८००० पावलं सुरक्षित?

संशोधनातून असे समोर आले आहे की, नियमित चालल्याने (Walking) मृत्यूदर आणि हृदयविकार यांच्यातील संबंध समजले जातात. नियमितपणे ८००० पावले चालल्याने मृत्यूचा धोका कमी होऊ शकतो. हृदयाचे (Heart) आरोग्य राखण्यासाठी ७००० पावलं चालणे सुरक्षित आहे.

Health Benefits of Walking
Women Qualities : महिलांमधील हे ५ गुण पुरुषांना करतात घायाळ!

2. नियमितपणे चालल्याने शरीराला कसा फायदा होतो?

1. फास्ट चालणे फायदेशीर

फास्ट चालल्याने आरोग्यासाठी (Health) फायदेशीर ठरु शकते. यामुळे शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

2. वजन कमी होते

दररोज ८००० पावलं चालल्याने लठ्ठपणाचा धोका कमी होतो, तसेच अधिक कॅलरीज बर्न होतात. वजनही कमी होते. शरीरातून घाम निघून बॅक्टेरीया निघतात. मधुमेह असणाऱ्यांनी नियमितपणे चालल्याने फायदा होतो.

Health Benefits of Walking
Heart Health : वायूप्रदूषणामुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ, तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

3. रक्तदाब नियंत्रणात राहातो.

चालण्याने रक्तदाब नियंत्रणात राहाण्यास मदत होते. तसेच व्यायामासोबत शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com