Heart Rate: तुम्हालाही प्रश्न पडलाय का हार्ट रेट किती असावा? कमी-जास्त असल्यास कोणत्या समस्या उद्भवतात

Heart Rate :आपला हार्ट रेट किती असावा याबाबत सर्वांनी सतर्क असणे महत्त्वाचे आहे.
Heart Rate
Heart Rate Saam Tv
Published On

Heart Rate News :

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा लोक शरीराकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते. रोजची धावपळ आणि वातावरण यामुळे मोठ्या प्रमाणात आजार वाढतात. यात हृदयविकाराच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

शरीराची योग्य काळजी आणि खाण्यापिण्याच्या वेळा न पाळल्याने हृदयविकाराचे आजार होतात. हृदयविकाराचे आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे शारीरिक आणि मानसिक ताण. यामुळे रोज हार्ट रेटमध्ये वाढ होत असते. अनेकदा हार्ट रेट जास्त असणे आणि कमी असणे धोक्याचे ठरु शकते. हार्ट रेट किती असावा याबाबत सर्वांनी सतर्क असणे महत्त्वाचे आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हार्ट रेट किती असावा?

अनेकदा मनावर, शरीरावर जास्त ताण आल्याने हार्ट रेट वाढतो. हार्ट रेटचे प्रमाण हे १०० पेक्षा अधिक असू नये. अन्यथा शरीरास खूप त्रास होऊ शकतो. हार्ट रेट जास्त असल्याने हृदयाची धडधड मोठ्या प्रमाणात वाढते. धावपळ, झोपेची अस्थिरता आणि मानसिक आणि शारीरिक तणाव यामुळे हार्ट रेट वाढत असतो.

हार्ट रेट नेहमी नियंत्रणात असावा. हार्ट रेटचे प्रमाण जास्त असणे हानिकारक असते. तसेच ते कमी असणेदेखील धोकादायक ठरु शकते. हार्च रेट ६० पेक्षा कमी नसावा. हार्ट रेट ४०-५० पेक्षा कमी असल्यास अशक्तपणा जाणवतो, डोळ्यासमोर अंधूकपणा येतो आणि चक्करही येते. साधारपणे हार्ट रेट हा ६० ते १०० इतका असावा.

Heart Rate
Chanakya Niti On Relationship : पतीचे पत्नीबद्दलचे आकर्षण हळूहळू कमी होतेय? या गोष्टींची काळजी घ्या

हृदयाची काळजी अशी घ्याल

हृदयाचे आजार होऊ नये यासाठी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. शरीराला पुरेसा आणि सकस आहार महत्त्वाचा असतो. तसेच रोज शारीरिक व्यायाम केल्याने हृदयाचे आजार कमी होतात. आजारांपासून दूर राहण्यासाठी रोजच्या जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे. योगासने करणे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

Heart Rate
Yoga For High Blood Pressure : दररोज फक्त 10 मिनिटे हा प्राणायाम करा, उच्च रक्तदाबा त्रास कमी होईल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com