Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 Children: रॉकेट्री टीमच्या त्या एका कृतीनं पुन्हा ‘हृदय’ जिंकलं, ६० मुलांचं आयुष्यच बदलणार

R Madhvan News: चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. अशातच या चित्रपटाच्या टीमने केरळमधील काही मुलांसोबत एक अनोखा उपक्रम राबवला आहे.
Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 Children
Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 ChildrenSaam Tv
Published On

Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 Children

मनोरंजनसृष्टीमध्ये मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची’ २४ ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. या वर्षी २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मच्या कॅटेगरीमध्ये आर माधवनच्या ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाला ‘६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ जाहीर झाला आहे. चित्रपटावर सर्वच क्षेत्रातून कौतुकाचा वर्षाव होत असताना या चित्रपटाच्या टीमने एक अनोखा उपक्रम राबवला आहे.

Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 Children
Tiger 3 New Poster: 'टायगर ३'मधील कतरीना कैफचा फर्स्ट लूक समोर, हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसली झोया

मूलन फाउंडेशनच्या धर्मादाय कार्यक्रमामध्ये केरळमधील काही वंचित मुलांवर हृदय शस्त्रक्रिया करण्यासाठी ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटाच्या टीमने अनोखी मोहीम राबवली आहे. ७ ऑक्टोबर रोजी कोचीच्या अंगमाली येथील ॲडलक्स इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये चित्रपटाच्या निर्मात्यांनी या मोहिमेची घोषणा केली आहे. दरम्यान, अभिनेत्याने वर्गीस मूलन फाऊंडेशनसोबत सहकार्य करत जन्मजात ६० मुलांना हृदयविकाराच्या समस्या असलेल्यांचे हृदय शस्त्रक्रिया करत जीवन बदललेय.

चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी वर्गीस मूलन आणि विजय मूलन यांनी हा उपक्रम राबवला आहे. केरळमधील वंचित मुलांसाठी हृदय शस्त्रक्रिया करण्याचा अनोखा उपक्रम केला असून यातून अनेकांचे आयुष्य उजळणार आहे. ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ने सर्वोच्च राष्ट्रीय मान्यता मिळवली असून अभिनेता आर. माधवन यांच्यासाठी हा एक हृदयस्पर्शी क्षण होता.

Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 Children
Amitabh Bachchan Emotional Video: बॉलिवूडच्या 'शहेनशहा'ला वाढदिवसानिमित्त 'KBC 15'नं दिलं खास गिफ्ट; बिग बी म्हणाले, 'आणखी किती रडवणार'

आर माधवन दिग्दर्शित, ‘रॉकेट्री: द नंबी इफेक्ट’ या चित्रपटामध्ये आर माधवनने चित्रपटाच्या कथेचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन केले आहे. नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित असलेल्या चित्रपटात आर. माधवनने प्रमुख भूमिका साकारली आहे. हा चित्रपट जगभरात हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित झाला होता.

Rocketry Team Sponsored Heart Surgeries 60 Children
Animal New Poster: ‘ॲनिमल’च्या गाण्याचे रोमँटिंक पोस्टर रिलीज, लिपलॉक करताना दिसले रश्मिका आणि रणबीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com