Diabetes Health : दोन आठवड्यात मधुमेह येईल नियंत्रणात, संशोधनातून सिद्ध; अशी घ्या काळजी

Prevent Diabetes : आहाराची काळजी घेतल्यास आणि योग्य वेळी औषधे घेतल्यास दोन आठवड्यात मधुमेह आटोक्यात ठेवता येतो.
Diabetes Health Tips
Diabetes Health TipsSaam Tv
Published On

How To Control Blood Sugar :

भारतात मधुमेहाचा आजार हा झपाट्याने पसरत आहे. प्रत्येक वयोगटातील व्यक्ती मधुमेहाच्या आजाराने ग्रस्त आहे. अशातच सणासुदीच्या काळात मधुमेहाच्या रुग्णांची अधिक प्रमाणात काळजी घ्यावी लागते.

या काळात अतिरिक्त प्रमाणात गोडाचे, तेलाचे पदार्थ चवीने खाल्ले जातात. त्यामुळे रक्ततील साखरेचे प्रमाण वाढते. मधुमेहाच्या आजाराला सामोरे जावे लागते. डॉक्टरांना सांगितले की, मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपली जीवनशैली नीट ठेवली. आहाराची काळजी घेतल्यास आणि योग्य वेळी औषधे घेतल्यास दोन आठवड्यात मधुमेह आटोक्यात ठेवता येतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संशोधनातून असे समोर आले आहे की, आयुर्वेदिक औषध (Medicine) BGR-34 मधुमेह सहज नियंत्रणात ठेवता येतो. इंटरनॅशनल आयुर्वेदिक मेडिकल जर्नल (IAMJ) मध्ये याबाबत प्रकाशित करण्यात आले.

Diabetes Health Tips
Diabetes Health : या कारणांमुळे तरुणांमध्ये वाढतोय मधुमेह, जीवनशैलीत आजपासून हे बदल कराच!

पाटणा येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संशोधकांनी याबाबत माहिती दिली. महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक प्रभाचंद्र पाठक यांनी १४ दिवस मधुमेह असणाऱ्या रुग्णांना देखरेखीखाली उपचारासाठी ठेवले. या काळात रुग्णांना मधुमेहाची (Diabetes) औषधेही देण्यात आली. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करण्यात आला.

1. साखरेची पातळी नियंत्रणात

उपचारादरम्यान रुग्णांना बीजीआर-34, आरोग्यवर्धनी वटी, चंद्रप्रभावती यासारखी आयुर्वेदिक औषधे देण्यात आली. १४ दिवस उपचार केल्यानंतर रुग्णांची तपासणी कमी झाली. त्यात मधुमेह असणाऱ्या रुग्णांची साखरेची (sugar) पातळी नियंत्रणात ठेवण्यात आली. नियमितपणे जीवनशैली राखल्यास मधुमेह वाढण्याचा धोका देखील टळला.

Diabetes Health Tips
Weekly Rashi Bhavishya In Marathi : शुक्राचा कन्या राशीत प्रवेश! दिवाळी धनलक्ष्मीची कृपा, आळस सोडा; इच्छुकांचे विवाह जमतील

2. आहाराकडे लक्ष देणे गरजेचे

मधुमेह असाणाऱ्यांनी औषधांसोबत आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच रोज व्यायामही करायला हवा. योग्य वेळी औषधे, खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायाम केल्यास मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.

टीप : साम टीव्ही केवळ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com