Manasvi Choudhary
भारतीय आयुर्वेदानुसार अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या फुलांचा औषध म्हणून वापर केला जातो.
फुलांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. म्हणूनच निरोगी आणि चांगल्या आरोग्यासाठी फुलांचा वापर केला जातो.
अनेक प्रकारची फुले आहेत जी त्वचेपासून ते वेगवेगळ्या आजारांवर फायदेशीर आहेत.
गुलाबाच्या फुलांमध्ये टॅनिन, जीवनसत्वे ए, बी आणि सी असतात. जे निरोगी आरोग्यासाठी वापरले जाते.
गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या, वाळलेलं गुलाबाचं फूल औषधी गुणधर्म म्हणून वापरले जाते.
चंपा हे सुवासिक फूल आहे. त्वचेचे आजार, अल्सर, जखमा यावर आयुर्वेदिक औषध म्हणून ह्या फुलांचा उपयोग होतो.
चंपा हे फूल मळमळ, ताप , खोकला या या आजारांच्या उपचारांसाठी औषध म्हणून वापरले जाते
कमळ पांढरे किंवा गुलाबी रंगाचे असते. कमळाच्या फुलाला धार्मिक आणि अध्यात्मिकरित्या खूप महत्व आहे.