Heart Health
Heart HealthSaam Tv

Heart Health : वायूप्रदूषणामुळे हृदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ, तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टीप्स

Pollution Side Effects : वाढते प्रदूषण आणि धुळीमुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
Published on

Air Pollution Affect Heart Health :

मुंबईत वाढत जाणारे प्रदूषण आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरत आहे. वाढते प्रदूषण आणि धुळीमुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होताना दिसून येत आहे. त्यामुळे मोकळ्या हवेत श्वास घेणे देखील कठीण झाले आहे.

ज्यांना हृदयविकार आणि श्वसनासंबंधित आजार आहेत त्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. हवेत तरंगणारे प्रदूषित कण विषापेक्षाही अधिक धोकादायक आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपोलो हॉस्पिटलचे डॉ. निखिल मोदी म्हणतात की, प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम हा सूक्ष्म असला तरी त्याचे परिणाम हे अत्यंत हानिकारक आहेत. वायूप्रदूषण हे केवळ श्वासोच्छवासासाठीच नाही तर हृदयासाठी (Heart) देखील धोकादायक आहे. यासाठी आरोग्याची (Health) काळजी घेणे देखील गरेजेचे आहे.

Heart Health
Diabetes Health : दोन आठवड्यात मधुमेह येईल नियंत्रणात, संशोधनातून सिद्ध; अशी घ्या काळजी

1. हृदयासाठी किती धोकादायक?

डॉक्टरांनी सांगितले की, हवेतील विषारी कणांबद्दल आपल्याला पुरेशा प्रमाणात माहिती नसते. हवेत असणारे पार्टिक्युलेट मॅटर, नायट्रोजन डायऑक्साइड आणि सेंद्रिय संयुगे यांसारखे घटक प्रदूषणात मिसळल्यामुळे जगभरात हृदयविकाराच्या रुग्णात वाढ होताना दिसून आली आहे. तसेच या प्रदूषणात अधिक काळ राहिल्यास उच्च रक्तदाबाचा (High Blood Pressure) त्रासही सहन करावा लागतो. हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात होण्याची शक्यता देखील शक्यता असते. प्रदूषणामुळे तणाव, छातीत जळजळ यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

2. ही खबरदारी घ्या

  • आरोग्य तज्ज्ञांच्या मते घराबाहेर पडताना फेस मास्क आवश्य घाला.

  • दिवसभर स्वत:ला हायड्रेट ठेवा.

  • रक्तदाब आणि मधुमेहाची चाचणी वेळोवेळी करा.

  • आहारात संत्री, बेरी आणि हळद यांसारख्या अँटी-ऑक्सिडंटने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करा.

  • तसेच आहारात सॅल्मन सारख्या ओमेगा-३ फॅटी अॅसिड समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करा. यासोबतच श्वासोच्छवासाचे व्यायाम करा.

टीप : साम टीव्ही केवळ माहिती वाचकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून कोणताही दावा करत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com