Hair Falls Treatment : केसगळती, विरळ केसांसाठी सगळं ट्राय करुन झाले? आयुर्वेदातील रामबाण उपाय करून पाहाच; केस होतील घनदाट

Home Remedies For Hair Falls : केसांची निगा व्यवस्थितरित्या राखली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Hair Falls Treatment
Hair Falls TreatmentSaam tv
Published On

Hair Care Tips :

केसांमुळे आपल्या चेहऱ्याला छान लूक येतो. यामुळे आपले व्यक्तिमत्त्व अधिक खुलून दिसते. केस आपल्या चेहऱ्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र केसांची निगा व्यवस्थित रित्या राखली नाही तर अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

अकाली केस पिकणे, केस कोरडे होणे, केसात कोंडा होणे, केस गळती यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. के गळती थांबवण्यासाठी आपण अनेक महागड्या उत्पादनांचा वापर करतो. त्यामुळे केसांची हानी होते. केसांची वाढही खुंटते. परंतु, आम्ही तुम्हाला आयुर्वेदातील असा रामबाण उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस घनदाट होतील, जाणून घेऊया त्याबद्दल  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

1. केस पातळ का होतात?

केस (Hair) पातळ होण्याची दोन कारणे आहेत. पहिला म्हणजे एंड्रोजेनेटिक एलोपेशिया आणि दुसरा टेलोजन इफ्लुव्हियम. आपल्या केसांमध्ये हेअर फॉलिक्स असतात. या हेअर फॉलिक्समुळे नवीन केस तयार होतात. पण कधी कधी हे फॉलिक्स अधिक लहान होतात. ज्यामुळे नवीन केस तयार होणे थांबले जाते. ज्यामुळे केस पातळ आणि गळू लागतात.

2. केसगळती थांबवण्यासाठी उपाय

1. आहार

केसगळती थांबवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे पौष्टिक आहार घेणे. नियमितपणे आहारात व्हिटॅमिन (Vitamin) ए, सी, ई, आयन, झिंक आणि इतर पोषक घटकांचा आहारात समावेश करा. यामुळे तुमची केसगळती थांबेल.

Hair Falls Treatment
Hair Falls Remedies : केस पातळ झाले, प्रमाणापेक्षा जास्त गळतात? हा हेअर मास्क ट्राय करा, महिन्याभरात मिळेल रिजल्ट

2. भृंगराज

भृंगराज ही औषधी वनस्पती असून केसांच्या समस्यावर बहुगुणी ठरते. केस तुटत असतील किंवा अकाली पिकत असतील तर पोषण देण्यासाठी पुरवठा करते. या तेलाने (Oil) मसाज केल्यास रक्ताभिसरण सुरळीत होते.

Hair Falls Treatment
Most Dangerous Fort In Pune : डोळ्यांना स्वर्गसुख देणारा पुण्यातील चित्तथरारक किल्ला, निसर्गाचं सौंदर्य पाहून ट्रेकर्सप्रेमींना भूरळ!

3. आवळा

केस चमकदार आणि मजबूत करण्यासाठी आवळा हा अतिशय गुणकारी समजला जातो. नियमितपणे केसांना ऑलिव्ह ऑईल, खोबऱ्याचे तेल आणि आवळ्याचे तेल लावल्यास केस तुटणे, गळणे आणि पातळ होण्याच्या समस्येपासून सुटका होऊ शकते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com