कोमल दामुद्रे
महाराष्ट्रात असे अनेक किल्ले आहेत जे पर्यटकांना भूरळ घालतात.
डोंगरदऱ्या, टेकड्यांवर असे अनेक किल्ले आहेत जे पर्यटकांसाठी खास आकर्षणाचे ठिकाणं बनले आहे.
त्यातील एक पुण्यातील जीवधन किल्ला. जो आजही पर्यटकांना भूरळ घालतो आहे.
घाटघरच्या परिसरात असलेला हा पूर्वमूखी किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता.
नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
पश्चिम दरवाजाने गडावर पोहोचल्यानंतर समोरच गजलक्ष्मीचे शिल्प आहे. स्थानिक लोक याला "कोठी" म्हणतात.
दक्षिण दिशेस जीवाई देवीचे पडझड झालेले मंदिर आहे. गडाच्या अंतर्भागात एकात-एक अशी पाच धान्य कोठारे आहेत.
आयताकार असणाऱ्या या गडाच्या टोकाला सुमारे ३५० फूट उंचीचा "वानरलिंगी" ऊर्फ खडा पारशी नावाचा एक सुळका लक्षवेधी आहे.
समोरच नानाचा अंगठा, हरिश्चंद्रगड, हडसर, चावंड आणि कुकडेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
जुन्नर - घाटघर मार्गे असणारी ही वाट म्हणजे राजमार्ग आहे. या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेकर्सप्रेमी रोपवेने जातात.