वा रं मास्तर! सहावीच्या विद्यार्थिनींना दिलं दहावीचे पेपर तपासण्याचं काम; Video Viral

6th Class Student Check SSC Paper: साताऱ्यातील एका धक्कादायक घटनेत इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनींना दहावीच्या मराठी बोर्ड परीक्षेचे पेपर तपासयला दिलेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
6th Class Student Check SSC Paper:
CLASS 6 STUDENTS CHECK SSC PAPERS IN SATARA SCHOOL; VIRAL VIDEO SPARKS OUTRAGEsaam tv
Published On
Summary
  • साताऱ्यातील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • सहावीच्या विद्यार्थिनींकडून दहावीच्या मराठी पेपरची तपासणी.

  • घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

दहावी, बारावीच्या पेपर फुटीचे प्रकरण घडत असतानाच साताऱ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. दहावीच्या परीक्षेचं पेपर चक्क सहावीमधील विद्यार्थिनी तपासत असल्याची बाब घडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला असून, संबधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

दहावीच्या बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतर विद्यार्थांच्या भवितव्य ठरत असतं. मात्र साताऱ्यात विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला. साताऱ्यातील विडणी येथील उत्तरेश्वर हायस्कूलमध्ये दहावीच्या मराठीचा पेपर सहावीच्या विद्यार्थिनींकडून तपासून घेतला गेला. या प्रकारामुळे दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे.

फलटण तालुक्यातील विडणी येथील खासगी शाळेत हा प्रकार घडला असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होतोय. सहावीची विद्यार्थिनी दहावीच्या बोर्डाच्या विद्यार्थ्यांची उत्तर पत्रिका तपासत असल्याचा व्हिडिओमध्ये दिसत आहे. याबाबतची तक्रार दिल्यानंतर शिक्षण विभागाचा जिल्ह्यास्तरावरील अहवाल कोल्हापूर विभागाला मिळाला आहे. या विभागाचे अधिकारी उद्या शुक्रवारी शाळेला भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत.

उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन करताना या शिक्षकाने नियम धाब्यावर बसवले आहे. शिक्षकाने दहावीचे पेपर स्वतः तपासण्याऐवजी सहावीच्या दोन विद्यार्थिनींकडून तपासून घेतल्याचा आरोप होतोय. या धक्कादायक प्रकाराचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आलाय. त्यामध्ये संबंधित शिक्षक विद्यार्थिनींच्या मदतीने उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासताना दिसत आहेत. दरम्यान राज्य परीक्षा बोर्ड अशा बेजबाबदार शिक्षकावर कठोर कारवाई करणार का? असा संतप्त सवाल पालक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com