Sikkim Rain News : सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; 1500 पर्यटक अडकले

sikkim weather news : सिक्कीममध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे.
सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; 1500 पर्यटक अडकले
Sikkime Rain NewsSaam TV

संपूर्ण देशभरात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहेत. त्यातच सिक्कीममध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या असून रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. या पावसात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो १५०० हून अधिक पर्यटक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत.

सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; 1500 पर्यटक अडकले
Weather Forecast : मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पाऊस कोसळणार; वाचा हवामान खात्याचा अंदाज

यामध्ये १५ विदेशी पर्यटकांचा देखील समावेश आहे. त्यांना वाचवण्यासाठी प्रशासनाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सिक्कीममध्ये अनेक पर्वतीय सरोवरे आहेत. ज्यामध्ये जास्त पाणी जमा झाल्याने भूस्खलनाच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर अनेक भागात दरडी देखील कोसळत आहेत.

तीस्ता नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदी काठावरील घरांमध्ये पाणी शिरलं आहे. ज्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. आतापर्यंत शेकडो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहेत. पावसामुळे सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे.

रस्ते वाहून गेल्याने अनेक शहरांचा संपर्क तुटला आहे. गुरुडोंगमार सरोवर आणि युनथांग व्हॅली यांसारख्या लोकप्रिय पर्यटन स्थळांसाठी ओळखल्या जाणाऱ्या मंगन जिल्ह्यातील जोंगू, चुंगथांग, लाचेन आणि लाचुंग सारखी शहरांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी मोबाइल नेटवर्क विस्कळीत झाले आहेत.

भूस्खलनामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी सरकार आधीच सतर्क असून अनेक तलावांवर उपग्रहाद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने मदत करा, असे आदेश सिक्कीमचे मुख्यमंत्री तमांग यांनी दिले आहेत. सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून पीडितांना योग्य ती मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर, रस्त्यांना नद्यांचं स्वरुप; 1500 पर्यटक अडकले
Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, मौसमी वाऱ्यांचा वेग मंदावला; IMD कडून धडकी भरवणारी अपडेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com